नगरमध्ये काय आहेत नियम ? एकदा वाचून घ्या अन्यथा होऊ शकते कारवाई

  • by

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यात रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. संचार बंदीचा आदेश पूर्वीचाच असून या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिला आहे. हा आदेश 23 फेब्रुवारी पासून 15 मार्चपर्यंत अमलात राहणार आहे.

सकाळी 9 ते रात्री 9 ही दुकाने सुरू ठेवण्याची वेळ होती तसेच पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येणार नाही व लग्न-समारंभात पन्नास लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती मात्र या नियमाची कुठेही अंमलबजावणी होत नव्हती या 29 जानेवारीच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना देणारा नवा आदेश जिल्हाधिकारी यांनी सोमवारी सायंकाळी दिला आहे आणि या आदेशाची सोमवारी रात्रीपासूनच अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

पूर्वीच दिलेला 29 जानेवारीचा आदेश कायम राहणार असून 23 फेब्रुवारीपासून 15 मार्च पर्यंत आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे आव्हान आता यंत्रणेने पुढे आहे. त्यामध्ये रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू केलेली असून पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे तर विवाह समारंभात 50 पेक्षा जास्त लोकांना सहभागी होता येणार नाही तर अंत्यसंस्कारासाठी देखील वीस व्यक्तींचे लिमिट प्रशासनाने ठरवून दिलेले आहे.

सार्वजनिक कार्यक्रमांना देखील 50 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई असून आणि रेस्टॉरंटमध्ये क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांनाच परवानगी देण्यात आलेली आहे. विविध सभा-संमेलने जत्रा किंवा संस्थांच्या सभासाठी पन्नास व्यक्तींनाच परवानगी आहे मात्र या दरम्यान देखील मास्क सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर अनिवार्य केले आहे.