‘ मोदीजी अहंकाराचे काही तरी लिमिट असेल, लाज वाटु द्या ‘

शेअर करा

जगातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी केलं. या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. त्यावर काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये आता जोरदार वाक् युद्ध सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे तर क्रिकेटप्रेमींमध्ये देखील मोठ्या प्रमाणात संताप दिसत आहे. हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा अपमान असल्याचं काँग्रेस नेत्यांनी म्हटलंय. काँग्रेसच्या या टीकेला उत्तर देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘ संकुलातील क्रिकेट स्टेडियमला फक्त पंतप्रधान मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे ‘ अशी सारवासारव केली आहे.

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही स्टेडियमच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर टीका केली आहे. कधी सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी सरदार पटेल यांच्या जगातील सर्वात उंच प्रतिमेचं कौतुक केलं आहे? ते कधी तिथे गेले? यापेक्षा अधिक काय बोललं जाऊ शकतं, अशा शब्दात प्रसाद यांनी काँग्रेस नेत्यांवर हल्ला चढवला आहे.

स्टेडियमला पंतप्रधान मोदी यांचं नाव देणं म्हणजे सरदार पटेल यांचा घोर अपमान असल्याचं काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटलंय. मोटेरा स्टेडियमवरुन सरदार पटेल यांचं नाव हटवून नरेंद मोदी यांचं नाव देणं हा स्वातंत्र्याच्या महानायकाचा घोर अपमान आहे, असं ट्वीट श्रीनेत यांनी केलं आहे. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांचा उद्देशून तुमच्या गर्व आणि अहंकाराला कुठेतरी सीमा असेल, लाज वाटुद्या, असा एक व्हिडीओ देखील त्यांनी शेअर केला आहे.

‘सरदार पटेल यांच्या नावानं मतं मागणारी भाजप आता पटेल यांचा अपमान करत आहे. गुजराजची जनता सरदार पटेल यांचा अपमान सहन करणार नाही. बाहेरून मित्रता आणि आतून वैर, सरदार पटेल यांच्याबाबत भाजपचा असा व्यवहार राहिला आहे’, अशी टीका गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी केली आहे.


शेअर करा