पुणे हादरले .. अवघ्या काही तासात पुण्यात दुसरा मर्डर : कुठे घडली घटना ?

शेअर करा

पिंपरी चिंचवड भागात प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुण्यात काही तासांमध्येच दुसरी हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. किरकोळ कारणावरून हत्या होत असल्याने पुणे हे महाराष्ट्राची क्राईम कॅपिटल झाली की काय अशी परिस्थिती तयार झाली आहे . हॉटेल व्यावसायिकावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना नऱ्हे येथे शुक्रवारी सव्वासहाच्या सुमारास घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे . सिंहगड रोड पोलिस ठाण्यात याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे .

सुनील बारकू लांगोरे (वय ३५, रा. नऱ्हे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून राहत्या घराजवळ त्यांचे छोटेसे स्नॅक सेंटर होते. लॉकडाउनमुळे त्यांचे कामगार गावाकडे गेले असल्याने मागील काही दिवस ते एकटेच हॉटेल उघडत होते. चहा आणि नाष्टा असे काही ठराविक मेन्यू बनवून ते शक्य तसे आपली गुजराण करत होते .

नेहमीप्रमाणे त्यांनी शुक्रवारी हॉटेल उघडले. हॉटेलमध्ये आलेल्या काही व्यक्तींशी त्यांची बाचाबाची झाल्यावर संबंधित व्यक्तींनी धारदार शस्त्राने त्यांच्या यामध्ये रक्ताच्या थारोळ्यात ते जागीच पडले. यानंतर आरोपी तेथून फरार झाले. आजूबाजूच्या नागरिकांनी सिंहगड पोलिसांना ही माहिती दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार शेळके व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला. पंचनामा करून तपासासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत .


शेअर करा