रेखा जरे खून प्रकरण : बाळ बोठे सापडेना म्हणून रुणाल जरे यांचा ‘ मोठा ‘ निर्णय

शेअर करा

रेखा जरे यांच्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्यासाठी कोण लपवाछपवी करत आहे? पोलिसांची गुप्तचर यंत्रणाही का काम करू शकत नाही? सरकार त्याला पाठीशी घालतेय काय? असे प्रश्न उपस्थित करीत जरे यांचा मुलगा रुणाल यांनी पाच मार्चपासून पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे, जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी याप्रकरणी एक निवेदन दिलेले आहे. रेखा जरे यांचे प्रकरण दडपण्यासाठी मोठे कारस्थान सुरू असल्याचा संशयही जरे यांनी व्यक्त केला असून एकप्रकारे हे यंत्रणेला दिलेले आव्हान असल्याची देखील त्यांनी टीका केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात काय दिला आहे इशारा ?

आपल्या आईच्या म्हणजे रेखा जरे यांच्या हत्येला ८७ दिवस उलटून गेले आहेत. तरीही यातील मुख्य सूत्रधार पोलिसांना सापडलेला नाही. एवढे सक्षम अधिकारी असतानाही आरोपी सापडत नाही. त्यामुळे सरकार त्याला पाठीशी घालत आहे, असे वाटते. त्यामुळे पोलिसांची गुप्तचर यंत्रणा काय करते? हे प्रकरण दडपण्याचा तर प्रयत्न सुरू नाही ना? यात कोणी तरी लपवाछपवी तर करीत नाही ना, असे प्रश्न पडले आहेत.

मी व माझे वडील पोलिसांना मदत करायला सतत तयार आहोत. यासाठी आम्ही अधिकारी आणि मंत्र्यांनाही भेटलो. मात्र, माझ्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडूनही मिळू शकली नाहीत. त्यामुळेच मोठे कट कारस्थान करून या गुन्ह्याची चौकशी दडपण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. हिंमत असेल तर चौकशी करून दाखवा, अशा प्रकाराचा संदेशच जणून यातून दिला जात आहे.

पोलिसांवर मोठा राजकीय दबाव असल्यासारखे वाटत आहे. शिवाय मंत्रीही स्वत: यावर बोलत नाहीत. देशात नावाजलेल्या महाराष्ट्र पोलिसांना हा आरोपी सापडत नाही, यामागे नेमके कारण काय? यामागे कोण आहे? आम्ही एवढा पाठपुरावा करूनही आम्हाला नेमकी उत्तरे मिळालेली नाहीत. माझी आई राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी असली तरी शेवटी ती एक स्त्री होती.त्या दृष्टीने या प्रकरणाकडे पाहिले पाहिजे.

पोलिसांवर आमचा विश्वास होता. मात्र, दोषारोपपत्र दाखल झाले तरीही मुख्य आरोपी सापडत नाही. त्यामुळे आरोपीला अटक होऊन शिक्षा होऊपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. आपण उपोषणाची परवानगी मागितली, मात्र ती देण्यात आलेली नाही. तरीही आपण पाच मार्चपासून उपोषण करणार आहोत. याची जबाबदारी प्रशासनावर राहील ‘

काय आहे नेमके प्रकरण ?

रेखा जरे या पुण्यावरून अहमदनगरला येत असताना जातेगावच्या घाटात असतानाच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या रेखा यांना काही वेळातच नगर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. घटनेत घातपाताचा देखील संशय सुरुवातीपासूनच व्यक्त केला जात होता तसेच घडलेले कारण हे तात्कालिक नसावे तर हा पुर्ननियोजीत कट असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत होती आणि अखेर ती खरी ठरली.

गाडीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून रेखा जरे यांची आरोपीसोबत बाचाबाची झाली आणि त्यानंतरच जरे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाला. जरे यांच्यासोबत त्याच्या आई आणि लहान मुलगा होता. गाडीचा मिरर लागल्याच्या शुल्लक कारणावरून हुज्जत घालण्यास सुरुवात झाली होती.

रेखा जरे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे जरे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी बोठे देखील हजर होता तेव्हापासूनच पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता. दरम्यान याच गुन्ह्यातील इतर आरोपीना अटक होताच बोठे फरार झाला आणि अद्यापदेखील पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दरम्यान या घटनेमुळे नगर जिल्हा हादरून गेला असून लवकरात लवकर बोठे यास अटक करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.


शेअर करा