… म्हणून पोलिस चक्क कोंबड्याला घेऊन जाणार कोर्टात : काय आहे प्रकरण ?

शेअर करा

भारतात रोज नवनवीन आणि विचित्र अशा बातम्या धुमाकूळ घातलं असतात, अशीच एक बातमी आता तेलंगणामधून आलेली आहे. तेलंगणामध्ये एका कोंबड्याला आपल्या मालकाची हत्या केल्याप्रकरणी शिक्षा होऊ शकते. सध्या या कोंबड्याला पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आलं आहे. इतकंच नाही तर या गुन्ह्यामुळे त्याला न्यायालयात हजरही व्हावं लागणार आहे.एखादा कोंबडा कायदेशीर प्रक्रियेतून जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागील जानेवारीतही दोन कोंबड्यांना 10 लोकांसह तीन दिवस लॉकअपमध्ये ठेवलं गेलं होतं.

उपलब्ध वृत्तानुसार, ही घटना राज्यातील जगतियाल जिल्ह्यातील गोलापल्लीची आहे. गोलापल्लीमध्ये मंदिराजवळ कोंबड्यांची लढाई होणार होती. याचसाठी पोल्ट्री चालवणारे 45 वर्षाचे टी सतैयादेखील तयारी करत होते. अशा लढायांसाठी कोंबड्यांना तयार करण्यात त्यांना उत्तम समजलं जातं. सकाळी ते कामावर आले आणि कोंबड्याच्या पायात 3 इंचाचा चाकू बांधला. त्यांनी पहिल्या कोंबड्याला खाली ठेवून दुसऱ्याला हातात घेण्याचा प्रयत्न करताच तो चाकू खाली पाडण्याचा प्रयत्न करू लागला. याच दरम्यान चुकून सटकून चाकू सतैया यांच्या कमरेत घुसला.

यानंतर सतैया यांच्या शरीरातून प्रचंड रक्त येऊ लागलं. रुग्णालयात घेऊन जात असतानाच रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चाकू आणि जप्त केलेल्या कोंबड्याचे फोटोही घेतले गेले आहेत. पोलिसांनी सांगितलं, की आम्ही दोन दिवस या कोंबड्याला पोलीस ठाण्यात ठेवलं. मात्र, नंतर त्याला जवळच्याच एका पोल्ट्री फार्ममध्ये पाठवलं. न्यायालयानं आदेश दिल्यास त्याला न्यायालयात हजर केलं जाईल. सतैया यांच्या पत्नीनं सांगितलं, की अशा लढायांमध्ये ते नेहमीच सामीस व्हायचे. प्रत्येक लढाईची त्यांना 1500 ते 2000 रुपये मिळायचे.

तेलंगणामध्ये कोंबड्याची लढाई अवैध आहे. मात्र अनेक ठिकाणी गुप्तपणे आजही याचं आयोजन केलं जातं. या लढाईमध्ये एका दोन कोंबड्यांना एकामेकांसमोर लढाईसाठी सोडलं जातं. इथे त्यांच्यावर लाखो रुपयांची पैज लावली जाते. अशा लढतीदरम्यान कोंबड्याना दारू देखील पाजली जाते त्यामुळे सरकारने अशा गोष्टींवर बेगडी शर्यतीप्रमाणेच बंदी आणलेली आहे.


शेअर करा