खळबळजनक..नाशिकमध्ये तरुणाची पोलिसाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या, व्हिडीओ व्हायरल

  • by

नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून एका तरुणाच्या आत्महत्येमुळे नाशिकमधील भीमवाडी परिसरात प्रचंड तणाव आहे. या तरुणाने कोणत्या गुंडांच्या किंवा इतर कुणाच्या त्रासामुळे आत्महत्या केली नसून पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. सदर तरुणाचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात त्याने पोलीस अधिकाऱ्यावर आरोप केले आहेत. योगेश हिवाळे असे या तरुणाचे नाव असून सोमवारी रात्री त्याने आत्महत्या केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, योगेश गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला तरुण आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. त्यात त्याने पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. नाशिकमधील गंजमाळ परिसरात भीमवाडी याठिकाणी ही घटना घडली. सदर घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव आहे तर स्थानिकांनी योगेशला न्याय मिळावा याकरता ठिय्या आंदोलन केल्याने केले आहे आणि त्याच्या नातलगांनी योगेशचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

भद्रकाली पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या भीमवाडी याठिकाणी हा प्रकार घडला. साधारण रात्री उशीरा 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. योगेशच्या कुटुंबीयांकडून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा पोलिस फौजफाटा दाखल झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पोलीस आयुक्तांनी या घटनेचा तपास नाशिक शहराच्या क्राइम ब्रँचकडे वर्ग केला आहे. क्राइम ब्रँचकडून नातेवाईंकांची चौकशी केली जात आहे. त्यांचे जबाब नोंदविले जात आहेत. पोलिसांनी अशी माहिती दिली की हा तपास निपक्ष: पाती व्हावा याकरता क्राइम ब्रँचकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान योगेशचे नातेवाईक, मित्र परिवार आणि कुटुंबीय यांच्याकडून न्यायाची मागणी केली जात आहे.

योगेश याच्याविरुद्ध भद्रकाली आणि सरकारवाडा पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहे. यापूर्वीही त्यास तडीपार करण्यात आले होते. त्याने ती रद्द करुन आणली होती. त्यानंतरही त्याने गुन्हे करणे सुरुच ठेवले होते. त्यामुळे पुन्हा एकदा त्याचा तडीपारीचा प्रस्ताव पोलिस उपायुक्ताना पाठविण्यात आला आहे. त्यासंदर्भात त्यास नोटीसही बजावण्यात आल्याचे पोलिसानी सांगीतले.

मोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड केलेल्या या एक मिनीटाच्या व्हिडिओमध्ये योगेशने “मी योगेश धुराजी हिवाळे.. मी फाशी घेतोय.. एस एस वऱ्हाडे, भद्रकाली माता साहेबानी माला प्रचंड त्रास दिलेला आहे, मला कधीही जाता येता धमक्या दिल्या आहेत. तुझ्याकडे थोडे दिवस बाकी आहे, तुला जेवढे जगायचे आहे, तेवढे जगून घे…त्यांनी मला खुप त्रास दिला आहे, त्यांनी फाशी घ्यायला मला मजबुर केलं आहे, माझ्या आई-वडीलांना, भावाला त्रास करु नका, वऱ्हाडे साहेबांनीच मला त्रास दिला आहे, बाकी कुणी नाही; असे सांगताना दिसत आहे.