मंदार फडकेचा कान पकडून ‘ माफीनामा ‘ होतोय व्हायरल, काय आहे प्रकरण ?

  • by

छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास एका साचेबद्ध पद्धतीने लिहून संभाजी महाराजांच्या महान कार्याचे ठराविक इतिहासकारांकडून अवमूल्यन करण्यात आले . महाराजांच्या महान कार्याबद्दल हळूहळू लोकांमध्ये जागृती होत असली तरी देखील अजून देखील काही जण महाराजांकडे काही विकृत इतिहासकारांनी रंगवलेल्या छबीमध्येच रमलेले पाहायला मिळत आहेत. अशाच एका मंदार फडके नावाच्या विकृत व्यक्तीस संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यानी चांगलेच फैलावर घेतले असून त्याच्याकडून ‘ माफीनामा ‘ लिहून घेतला असून त्याचा हा माफीनामा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे .

काय आहे प्रकरण ?

मंदार फडके असे या नतभ्रष्टाने नाव असून फडके बुक हाऊस या प्रकाशनाने प्रकाशीत केलेल्या शालेय गाईड मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचेबद्द्ल चुकीचा मजकूर छापला होता. महाराजांबद्दल चुकीचा मजकूर छापल्याने संभाजी ब्रिगेडचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील आणी मावळ्यांनी फडकेला चांगलेच सरळ करून जाहीर माफी मागावयास भाग पाडून सदर वादग्रस्त पुस्तक बाजारातून परत घेऊन नवीन आवृतीत सुधारणा करण्याची लेखी हमी घेतली देखील घेतलेली आहे .

मंदार फडके याने दिलेल्या माफीनाम्यात, ‘ मी मंदार मोरेश्वर फडके राहणार कोल्हापूर ,आम्ही मराठ्यांचा राजकीय इतिहास या गाईडचे प्रकाशन केले होते त्यातील पण क्रमांक ९ वर संभाजी महाराजांच्या नावावर आक्षेपार्ह विधान लिहलेले होते. तरी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ही चूक निदर्शनास आणली तरी मी समस्त शिवशंभू प्रेमींची माफी मागतो, तरी झालेल्या प्रकाराबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो ‘ असे लिहलेले आहे .