अजित पवारांचा दणका, फडणवीस सरकारच्या ‘ ह्या ‘ ड्रीम प्रोजेक्टच्या चौकशीची घोषणा

  • by

‘ फडणवीस सरकारच्या महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेची विधिमंडळाच्या संयुक्त समितीतर्फे चौकशी करण्यात येणार’, अशी घोषणा करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार दणका दिला आहे.फडणवीस सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा ३३ कोटी वृक्षांची लागवड नक्की कुठे झाली ? याचे उत्तर अद्याप देखील ९० टक्के नागरिकांना सांगता येणार नाही,अशातच चौकशीची घोषणा अजित पवार यांनी केलेली असल्याने भाजपचे धाबे दणाणले आहे.

दत्तात्रय भरणे यांनी यावर बोलताना , ‘ फडणवीस सरकारच्या काळातील 33 कोटी वृक्षारोपण करण्यात आले होते. राज्यात वर्ष 2016 ते 2017 आणि 2019-20 या कालावधीत वन विभागाने वृक्ष लागवड योजनेत 28.27 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली. ऑक्टोबर 2020 अखेरीस त्यातील 75.63% रोपे म्हणजे २१ कोटी जिवंत आहेत,त्याची देखभाल करण्यात येत आहे. 2017 ते 2019 कालावधीत वन विभागाने शासकीय यंत्रणा ,शैक्षणिक संस्था,उद्योगसमूह ,खासगी व्यक्ती यांच्या माध्यमातून 50 कोटी वृक्ष लावण्याची मोहीम राबाबण्यात आली होती. ही मोहिम राबवण्यासाठी २०१६-१७ ते २०१९-२० दरम्यान २४२९.७८ कोटी निधी मिळाला होता तो पूर्ण वापरण्यात आला का ? २५ टक्के रोपं जिवंत का राहिली नाही याची चौकशी केली जाईल ” अशी मागणी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी ‘ या प्रकरणाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लेखी उत्तर दिले आहे. मग मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर मंत्र्यांचा विश्वास नाहीये का ? आम्हाला चौकशीची अडचण नाहीये पण तुमचा तुमच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाहीये का?’ असा सवाल सत्ताधाऱ्यांना विचारला त्यावर जोरदार पलटवार करत नाना पटोले यांनी ‘सभागृहाचं उत्तरावर समाधानी नसेल तर विधीमंडळाची चौकशी समिती नेमली जात असते. हा तर तुमचा ड्रीम प्रोजेक्ट होता, फडणवीस तुमचा होता की मुनगंटीवारांचा? मग समिती नेमण्यात येणार याची मिरची का लागली ? ” असा युक्तिवाद केला.

त्यानंतर अजित पवार यांनी ‘फडणवीस सरकारच्या महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेची विधिमंडळाच्या संयुक्त समितीतर्फे चौकशी होणार आहे. पुढील सहा महिन्यात चौकशी अहवाल तयार होणार असून तो सादर केला जाईल’, अशी घोषणा केली. कथित सिंचन घोटाळ्यावरून अजित पवार यांना विरोधकांकडून सतत लक्ष केले जात असताना ‘ 33 कोटी वृक्ष लागवड ‘ चौकशी विरोधकांच्या नाकी नऊ आणण्याची चिन्हे आहेत.