भाजपच्या मंत्र्याची ‘ पहिली ‘ सीडी बाहेर, महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत सापडले : वाचा पूर्ण बातमी

  • by

कर्नाटकमधील भाजप सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. एक सीडी सोशल मीडियात व्हायरल झाली असून त्यात भाजपा सरकारचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोली एका अज्ञात महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.रमेश जारकीहोली यांनी यानंतर राजीनामा दिलेला आहे.

कर्नाटकमध्ये हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात भाजपा सरकारचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोली एका अज्ञात महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पीडित महिला व कथित मंत्री यांच्या दोघांमधील संवादही समोर आला आहे. मंत्र्यावर सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून मुलीला सापळ्यात अडकवल्याचा आरोप आहे. कायद्यानुसार कारवाई करण्यापूर्वी सीडी तपासली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री बी.एस. येडुरप्पा यांनी घाईघाईने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यानंतर बी.एस. येडुरप्पा यांच्याकडे या मंत्र्याने राजीनामा सुपुर्त केला आहे. जारकीहोली हे गोकाक येथील भाजपचे आमदार आहेत.

60 वर्षांचे रमेश जारकीहोली एक मजबूत राजकीय व्यक्ती आहेत तसेच मजबूत मंत्र्यांमध्ये गणना होते. या घटनेबाबत राजकारणही तीव्र झाले आहे. असेही सांगितले जात आहे की 2019 मध्ये कॉंग्रेसमध्ये फोडाफोडी करण्यात याच मंत्र्यांची भूमिका खूप मोठी होती. सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यावर माध्यमांमध्ये बरीच खळबळ उडाली आहे.