उघड्यावरच चालला होता दोन जोडप्यांचा ‘ रोमान्स ‘ पोलिसांनी धरले आणि मग …

  • by

रस्त्यावर रोमान्स करणे दोन जोडप्यास चांगलेच महागात पडलेले आहे .उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर येथे उघड्यावर अश्लील चाळे करणाऱ्या एका महिलेला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जर ती महिला पाच हजार रुपये भरू शकली नाही तर तिचा तुरुंगवास सात दिवसांचा करावा असे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.

चार वर्षांपूर्वी दोन महिला व दोन पुरुष शहरातील मंडी भागात उभे होते. भर गर्दीच्या ठिकाणी हे चौघे एकमेकांना अश्लीलरित्या स्पर्श करत होते. त्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्यांचे हे चाळे बघितले व त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लील प्रकार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता .

याच चौघांविरोधात अशाच स्वरूपाचे वेगवेगळे खटले सुरू आहेत. त्यात सदर महिलेचा खटला निकाली लागला असून न्यायालयाने तिला दोषी ठरवत तिला दोन दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणातील इतर तीन आरोपींना देखील लवकरच शिक्षा सुनावण्यात येणार आहे.दैनिक सामनाने अशा प्रकारचे वृत्त दिलेले आहे.