महिलेसोबत सापडलेल्या भाजपच्या मंत्र्याच्या ‘ पहिल्याच ‘ व्हिडीओमध्ये मराठी माणसांबद्दल वक्तव्य

  • by

कर्नाटकमध्ये एका आक्षेपार्ह सीडी प्रकरणावरून मोठी खळबळ उडाली आहे. या आक्षेपार्ह सीडी प्रकरणात कर्नाटकच्या भाजपा सरकारमधील जलसंसाधन मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका सामाजिक कार्यकर्त्यांने हा व्हिडीओ व्हायरल केलेला असून कथितरित्या रमेश जारकीहोळी एका तरुणीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसून येत आहेत. राजकीय षड्यंत्र असल्याचे रमेश जारकीहोळी यांनी म्हटलं असलं तरी रमेश जारकीहोळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, अशातच रमेश जारकीहोळी यांचं वादग्रस्त संभाषण देखील लीक झालं आहे.

सदर संभाषणात, रमेश जारकीहोळी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. येडियुरप्पा यांनी खूप भ्रष्टाचार केला आहे आणि केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी कर्नाटकचे मुख्यमंत्री होतील असं जारकीहोळी यांनी म्हटलं आहे. तसेच मराठी लोक चांगले आहेत आणि … कानडींना काही काम नाही, असे देखील म्हटलेले असल्याने जारकीहोळी यांना कर्नाटकमध्ये हे प्रकरण चांगलेच शेकणार असे दिसते आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्री येडियुरप्पांवर जोरदार टीका केली. हे केवळ सेक्स स्कँडल नाही. त्या टेपमध्ये मंत्र्यांनीच मुख्यमंत्री येडियुरप्पा भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केला आहे, याचे मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावं लागेल, असं म्हटलं आहे.

रमेश जारकीहोळी आणि त्या महिलेचं काय आहे संभाषण

महिला – बेळगावात मराठी-कन्नड संघर्ष सारखा सुरू आहे?
जारकीहोळी – मराठी माणसं चांगली आहेत. … कानडींना काही काम नाही.
जारकीहोळी – सिद्धरामय्या उत्तम आहेत. येडियुरप्पांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आहे.
महिला – तुम्ही सारखे दिल्लीला जात असता, तुम्ही मुख्यमंत्री होणार का?
जारकीहोळी – प्रल्हाद जोशी मुख्यमंत्री होतील.

नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी रमेश जारकीहोळी यांच्यावर गंभीर आरोपही केला आहे. रमेश जारकीहोळी यांनी नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे. ट्रान्समिशन कॉरपोरेशन लिमिटेडमध्ये तरुणीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून शारिरिक संबंध ठेण्यास सांगितल्याचा आरोप दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे.यासंदर्भात दिनेश कलहळ्ळी यांनी रमेश जारकीहोळी यांची एक सीडी व्हायरल केली आहे. यामध्ये रमेश जारकीहोळी हे एका तरुणीला शरीरसंबंध ठेवण्याबाबत बोलत असल्याचा देखील दावा केला आहे.

काय आहे प्रकरण ?

कर्नाटकमध्ये रमेश जारकीहोळी यांचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात भाजपा सरकारचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोली एका अज्ञात महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पीडित महिला व कथित मंत्री यांच्या दोघांमधील संवादही समोर आला आहे. मंत्र्यावर सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून मुलीला सापळ्यात अडकवल्याचा आरोप आहे. कायद्यानुसार कारवाई करण्यापूर्वी सीडी तपासली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून रमेश जारकीहोळी यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे.

60 वर्षांचे रमेश जारकीहोली एक मजबूत राजकीय व्यक्ती आहेत तसेच मजबूत मंत्र्यांमध्ये गणना होते. या घटनेबाबत राजकारणही तीव्र झाले आहे. असेही सांगितले जात आहे की 2019 मध्ये कॉंग्रेसमध्ये फोडाफोडी करण्यात याच मंत्र्यांची भूमिका खूप मोठी होती. सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यावर माध्यमांमध्ये बरीच खळबळ उडाली आहे.