बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या : सविस्तर बातमी

शेअर करा

बॉलिवूडमधून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंग राजपूतने मुंबईत आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने इतका टोकाचा निर्णय का घातला याबद्दल अद्याप काहीही माहिती नाही.

टीव्ही अभिनेता म्हणून त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. सर्वप्रथम त्याने ‘किस देश में है मेरा दिल’ नावाच्या मालिकेत काम केले पण त्याला एकता कपूरच्या मालिका पवित्र रिश्ता पासून चांगलीच प्रसिद्धी मिळाली आणि त्यानंतर त्याने चित्रपटांचा प्रवास सुरू केला. ‘के पो छे’ या चित्रपटात तो मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत दिसला आणि त्याच्या अभिनयाचेही कौतुक झाले .महेंद्र सिंह धोनी या सुपर हिट झालेल्या चित्रपटात देखील तो मुख्य रोलमध्ये होता . सुशांतच्या कारकीर्दीतील हा पहिला चित्रपट होता ज्याने शंभर कोटी जमा केले. आमिर खानच्या पीके मध्ये देखील लहानश्या रोलमध्ये तो चांगला उठून दिसला होता .

वाणी कपूर आणि परिणीती चोप्रासोबत शुद्ध देसी रोमान्समध्ये देखील तो दिसला होता त्यानंतर सुशांत सिंह चिचोरे सारख्या चित्रपटांमध्येही दिसला होता. त्यांचा शेवटचा चित्रपट केदारनाथ होता ज्यात तो सारा अली खान सोबत दिसला होता.केदारनाथ मध्ये त्याने एका मुस्लिम युवकाचा रोल केला होता, हा चित्रपट वादात देखील सापडला होता.

महत्त्वाचे म्हणजे अलीकडच्या काळात बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी या जगाला निरोप दिला आहे. इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांचा एप्रिल महिन्यात मृत्यू झाला. नुकतेच गायक आणि संगीतकार वाजिद खान यांचे वयाच्या 42 व्या वर्षी निधन झाले.


शेअर करा