अर्णबला घरातून उचलणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे नक्की कोण ?

शेअर करा

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. या घटनेचा तपास सुरू असतानाच, त्या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातील मुंब्रा येथील रेतीबंदरच्या खाडीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल अनेक उलट सुलट चर्चांना उधाण आलेले असून पोलीस प्रकरणाचा तपास करत असतानाच देवेंद्र फडणवीस व आशिष शेलार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत .

टीव्ही ९ च्या वृत्तानुसार मनसुख हिरेन यांच्या तोंडावर रुमाल बांधलेले होते तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील मनसुख हिरेन यांचे हाथ बांधलेले होते, असे आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे . मनसुख हिरेन यांची डेड बॉडी स्वतः पाहिल्याचा दावा देखील फडणवीस यांनी केला आहे. प्रकरणाचा तपास हा आता एटीएस कडे सोपवण्यात आलेला आहे. आशिष शेलार यांनी सचिन वझे हे पोस्टमार्टेम सुरु असताना तिथे का उपस्थित होते ? यावर देखील आक्षेप घेतला आहे. ‘ आपले वडील कधीच आत्महत्या करणार नाहीत ‘ असा दावा देखील हिरेन यांच्या मुलाने एका निकटवर्तीयांशी बोलताना केलेला आहे . सदर प्रकरणाचा तपास हा एनआयएकडे देण्याची मागणी फडणवीस यांनी केली आहे .

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ गेल्या महिन्यात कार आढळली होती. तिची तपासणी केली असता, त्यात जिलेटिनच्या कांड्या आढळल्या होत्या. त्यामुळे खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास सुरू होता. ही कार कुणाची आहे याची माहिती उघड झाली होती. मनसुख हिरेन हे या कारचे मालक होते. त्यानंतर ते मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजरही झाले होते.

मनसुख हिरेन असं गाडी मालकाचं नाव आहे. गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलीसांसमोर हजरही झाले होते. गाडी चोरीला गेल्याचं त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं. क्राईम ब्रँचनं त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर आज मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा गुंता आणखी वाढला आहे. मनसुख हिरेन यांचा खून केला गेला की आत्महत्या की आणखी काही कारण आहे याचा तपास अजून सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांनी संशयाच्या भोवऱ्यात उभे केलेले सचिन वाझे नक्की कोण आहेत ते जाणून घेऊया

नव्वदच्या दशकातील ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट‘ अशी ख्याती असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे जवळपास 16 वर्षांनंतर 2020 मध्ये पोलिस दलात परतले. मुंबईतील घाटकोपर बस बॉम्बस्फोटाचा आरोपी ख्वाजा युनूसचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी काही पोलिसांवर हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप होता.

वाझेही या आरोपींपैकी एक होते. त्या प्रकरणात त्यांना 2004 मध्ये निलंबितही करण्यात आले होते. 2007 मध्ये त्यांनी राजीनामा दिला, मात्र तपास सुरु असल्याने तो मंजूर करण्यात आला नव्हता. त्यानंतर 2008 च्या दसरा मेळाव्यात ते शिवसेनेत दाखल झाले. काही चॅनेल्सवर ते शिवसेनेची भूमिका मांडताना देखील दिसले होते.

सचिन वाझे हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी 60 हून अधिक एन्काऊंटर केले आहेत. प्रदीप शर्मा अंधेरी सीआययूचे प्रमुख असताना त्यांच्या नेतृत्वात वाझे यांनी काम केलं आहे. सचिन वाझे यांच्यासह कॉन्स्टेबल राजेंद्र तिवारी, सुनील देसाई आणि राजाराम निकम यांनाही पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले आहे. सायबर क्राइम आणि बनावट नोटांशी संबंधित अनेक मोठी प्रकरणेही त्यांनी हाताळली आहेत. सॉफ्टवेअर डेवलपर म्हणूनही त्यांनी काम केलं. वाझेंनी एक अ‍ॅपही तयार केले होते. ते एका एनजीओ संबंधित कामही करायचे. गरजू लोकांना कायदेशीर मदत देणे हे या स्वयंसेवी संस्थेचे काम होते.


शेअर करा