‘ आमचे वैवाहिक जीवन सामान्य नव्हते ‘ भाजपच्या खासदार पुत्राच्या बायकोचा गौप्यस्फोट

शेअर करा

उत्तर प्रदेशमधील मोहनलालगंज येथील भाजपा खासदार कौशल किशोर यांचा मुलगा आयुष याने स्वत:वर गोळी झाडून घेतल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान या प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. स्वत:वर गोळी झाडून घेतल्यानंतर रुग्णालयात उपचार घेत असलेला आयुष रुग्णालयातूनच फरार झाला आहे तर आयुषच्या पत्नीने मोठा गौप्यस्फोट केला आहे.

आयुषची पत्नी म्हणाली की, माझे पती दिल्लीतील सरकारी निवासस्थानात लपून बसला आहे. माझे आयुषचे फोनवर बोलणे झाले होते. त्याची कॉल रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे. आयुष आर्थिक अडचणींचा सामना करत होता. व्यावहारिक देवघेवीवरून त्याचे चंदन गुप्ता नामक व्यापाऱ्यासोबत त्याचा वाद झाला होता. त्यालाच फसवण्यासाठी त्यानेच हे कारस्थान रचलेले आहे, असा दावा आयुषच्या पत्नीने केला आहे त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.

फरार झाल्यानंतर आयुष लखनौमध्ये खासदार असलेल्या वडिलांच्या घरी लपला होता. त्यानंतर आता तो खासदार निवासामध्ये राहत आहे. दरम्यान, कुटुंबीयांकडून येत असलेल्या दबावामुळे आय़ुष मला सोडत आहे. त्याच्यावरोधात साक्ष दिल्यास तो माझी साथ देणार नाही. आयुष आणि माझा भाऊ आदर्श यांच्यात मैत्री आहे. या मैत्रीमुळेच आदर्शने आयुषवर गोळी चालवण्यात त्याची साथ दिली होती.

आयुषने कुणाला तरी फसवण्यासाठी हे संपूर्ण कारस्थान रचले असल्याचा दावा तिने केला आहे. तसेच तो दिल्लीतील सरकारी निवासस्थानामध्ये लपून बसल्याचा तसेच खासदार वडील आपल्या मुलाला वाचवत असल्याचा दावाही तिने केला आहे. आमचे वैवाहिक जीवन सामान्य नव्हते. या विवाहासाठी आयुषचे कुटुंबीय तयार नव्हते. तसेच आम्हा दोघांमध्येही काही आलबेल नव्हते. तो मला मारहाण करत असे, असा दावाही त्याच्या पत्नीने केला आहे.


शेअर करा