… असं काही तरी होणार याची मला अगोदरच कल्पना होती, बॉलीवूडमधील ‘ ह्या ‘ दिग्दर्शकाचा दावा

शेअर करा

बॉलिवूड अभिनेता आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी (१४ जून) आत्महत्या केली. मुंबईतील वांद्रे येथे राहत्या घरात सुशांतने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनाची माहिती समजल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये आणि बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सुशांत सिंह राजपूत याने इतकी टोकाची भूमिका का घेतली ? हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे

मुकेश भट्ट सुशांतच्या आत्महत्येविषयी टाइम्स नाऊ टीव्ही चॅनेलवर बोलले. मुकेश भट्ट म्हणाले की, ‘तो माझ्याकडे आला होता. मी त्याच्याशी बोललोही होतो, त्याच्या बोलण्यातून मला जाणवले की तो अस्वस्थ आहे. मग मला समजले की, त्याच्याबरोबर काहीतरी चुकीचे घडत आहे. आम्ही ‘सडक 2’ मध्ये एकत्र काम करण्याचा विचार करत होतो. महेश भट्ट सुपरहिट चित्रपट ‘सडक’चा रिमेक तयार करत आहेत, यात आलिया भट्ट, कुणाल रॉय कपूर, संजय दत्त आणि पूजा भट्ट दिसणार आहेत.

मुंबई पोलिसांचे प्रवक्ते डीसीपी प्रणय अशोक यांनी सुशांतच्या आत्महत्येची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की, अभिनेत्याच्या घरातून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, सुशांत गेल्या सहा महिन्यांपासून नैराश्यात होता. सुशांत सिंग राजपूत यांच्या नोकराने पोलिसांना बोलावून त्यांच्या आत्महत्येची माहिती दिली.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी सुशांत सिंग राजपूत याचे काही मित्रही त्याच्या घरी होते. सुशांत काही काळ त्याच्या खोलीत गेला होता. बराच वेळ मित्रानी त्याची वाट पाहिली पण तो आला नाही त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला कॉल करायला सुरुवात केली मात्र कॉल उचलले गेले नाही . अखेर मित्रांनी दरवाजा तोडला असता सुशांतचा मृतदेह पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत पाहायला मिळाला. या घटनेनंतर त्याच्या नोकराने पोलिसांना माहिती दिली.

सुशांत सिंह राजपूत याचे मित्र म्हणतात की, तो बर्‍याच दिवसांपासून नैराश्येत होता. सुशांत सिंग राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिने काही आठवड्यापूर्वी एका व्यावसायिकाबरोबर लग्न केले. सुशांतची मॅनेजर दिशा सॅलियन हिनेही पाच दिवसांपूर्वी आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येप्रकरणात सुशांतची देखील चौकशी करण्यात आली होती.

दरम्यान, सुशांतच्या मृत्यूची बातमी ऐकून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुलाच्या मृत्यूची बातमी मिळताच वडिलांचीही तब्येत खालावली आहे. मात्र अशाही परिस्थितीत एका इलेक्ट्रॉनिक चॅनेलचा प्रतिनिधी त्यांच्या घरात शिरून प्रश्न विचारून भंडावून सोडत होता .. देशातील मीडिया किती निर्लज्ज झालेला आहे याचे एक उदाहरण म्हणून ह्या गोष्टीकडे पाहता येईल .

काही महिन्यांपूर्वी सुशांतचा ‘छिछोरे’ हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात आत्महत्या करणे आयुष्यावरचा तोडगा नाही, असा संदेश सुशांतने दिला होता. आत्महत्या न करण्याचा संदेश देणा-या याच सुशांतने आज आत्महत्या करत जीवन संपवले, हे देखील एक दुर्दैवच म्हणावे लागेल .


शेअर करा