वैश्विक नेता असल्याचा दावा फोल, मोदींची लाट ओसरली, मोदींना भाजप नेत्याचाच आहेर

शेअर करा

एकीकडे पाच राज्यातील निवडणुकांच्या प्रचाराची धामधूम सुरू असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घरचा आहेर दिला आहे. सत्याचा स्वीकार करावा. अन्यथा पंतप्रधान मोदी यांची अवस्था पंचतंत्रातील वटवाघुळाप्रमाणे होईल, असा टोला ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदींना लगावला आहे. मोदी यांची जादू ओसरत चाललीच आहे यात दुमत नाही . मोदींच्या सभांना पहिल्यासारखी गर्दी होत नाही तसेच सोशल मीडियात देखील मोदींवर लोक निशाणा साधत आहेत यातून हे दिसून येत आहे .

सुब्रमण्याम स्वामी यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्याचे पाहायला मिळाले. पहाटे केलेल्या या ट्विटमध्ये सुब्रमण्यम स्वामी म्हणतात की, ‘ मोदी सत्याच्या क्षणापर्यंत पोहोचले आहेत. भारत देशाचे नेतृत्व करणारे वैश्विक नेते असल्याच्या दाव्यातील हवा निघून गेली आहे. आता QUAD आणि BRICS यापैकी एकाची निवड मोदींनी केली पाहिचे. अन्यथा याचा शेवट पंचतंत्रातील गोष्टीतल्या वटवाघुळाप्रमाणे होईल ‘

दरम्यान, भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या समूहाला QUAD असे संबोधले जाते. शुक्रवार, १२ मार्च रोजी या देशांच्या एका व्हच्युअल सभेमध्ये पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन हेदेखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यात चारही देशांचे राष्ट्राध्यक्ष सहभागी होणार असल्याचे ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, QUAD समूहातील चारही देशांचे नेते स्थानिक आणि ग्लोबल मुद्यांवर चर्चा करणार आहेत. मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशक हिंद-पॅसिफिक प्रदेश राखण्याच्या दिशेने सहकाराच्या व्यावहारिक क्षेत्रांवर कल्पनांची देवाणघेवाण या बैठकीत केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.


शेअर करा