लग्नाच्या पाच महिन्यानंतरही ‘सुहागरात’ला नकार, मेडिकल रिपोर्ट येताच पती नैराश्यात

शेअर करा

लग्नाच्या जवळपास 5 महिन्यानंतर जवळही येऊ न देणाऱ्या पत्नीबाबत जे सत्य समोर आलं, त्यावरुन पतीला धक्का बसला आहे. 28 ऑक्टोबरला या तरुणाचं लग्न झालं होतं. मात्र पती-पत्नीची मधुचंद्राची रात्र त्याच्या नशिबातच नव्हती. कारण ज्या मुलीशी लग्न केलं, ती तृतीयपंथी असल्याचं समोर आलं. या प्रकाराने तरुणाला आणि त्याच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये ही घटना घडली असून पती प्रचंड नैराश्यात आहे.

नववधू घरी आल्याने कुटुंबात आनंद होता. मात्र लग्नाला जवळपास पाच महिने झाले तरीही वधू आपल्या नवऱ्याला हातही लावू देत नव्हती. दररोज काही ना काही कारण सांगत होती. सतत्या बहान्यांनी वैतागलेल्या पतीला संशय आला. त्याने थेट डॉक्टरांकडे जाऊन तिची वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय घेतला. मेडिकल रिपोर्टमध्ये जे समोर आलं त्याने सगळ्यांच्याच तोंडाचे पाणी पळाले.

मेडिकल रिपोर्टनुसार वधू ही तृतीयपंथी आहे. ही माहिती जशी तरुणाच्या कुटुंबाला मिळाली, तसं सर्व कुटुंबाला धक्का पचवणे कठीण झाले. आपल्याशी धोका झाला असून, फसवून हे लग्न केल्याचा आरोप, संबंधित कुटुंबाने केला आहे. दुसरीकडे संबंधित वधूने देखील तरुणाच्या कुटुंबावर आरोप करत आपल्याला डांबून ठेवल्याचं म्हटलं आहे. हे सर्व प्रकरण पोलिसात गेलं.

वर आणि वधूच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये जोरदार गोंधळ घातला. मुलाच्या कुटुंबाने वधूला घरात ठेवण्यास नकार दिला. या कुटुंबाने पोलिसांना वधूचा मेडिकल रिपोर्ट दाखवला. जोरदार राडा झाल्यानंतर नववधू आपल्या माहेरच्या माणसांसोबत घरी निघून गेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वधू आपल्या माहेरी गेली आहे, याप्रकरणात कोणीही लिखीत तक्रार दाखल झालेली नाही.

तरुणाच्या कुटुंबाच्या आरोपानुसार, मुलीच्या कुटुंबियांनी आपल्याला अंधारात ठेवून, हे लग्न लावलं. मुलगी तृतीयपंथी असल्याचं जाणीवपूर्वक लपवल्याचा आरोप आहे. लग्नाच्या पाच महिन्यानंतरही तरुणाला वधूने हातही लावू दिला नाही, असं कुटुंबाचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर संबंधित तरुणी ही जबरदस्ती केल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती, असंही तरुणाचं म्हणणं आहे.


शेअर करा