पुण्यात हाहाकार..दररोज हजारो रुग्णांची नोंद,जाणून घ्या नेमकी परिस्थिती ?

शेअर करा

संपूर्ण राज्यात कोरोनामुळे हाहा:कार उडाला आहे. पुण्यात तर ही परिस्थिती जास्तच विदारक आहे. पुण्यात रोज हजारो नागरिकांना कोरोनाची लागण होत आहे. आज (14 मार्च) पुण्यात तब्बल 1740 बांधितांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच दिवसभरात उपचारादरम्यान 17 नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

पुण्यात मृतांची संख्या 4952 वर पोहोचली आहे. कोरोनाग्रस्तांचा मृत्यूदर असाच राहीला, तर आगामी दोन ते तीन दिवसांत पुण्यात मृतांचा आकडा 5 हजाराचा आकडा पार करु शकतो. रुग्णांमध्ये रोज होणारी ही वाढ आणि मृत्युदार चिंताजनक असल्याचे साथरोग तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. तर पुण्यात 355 रुग्णांची प्रकृती नाजूक असल्याचे समजते.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करण्यात येत असून आज दिवसभरात 1740 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर दिवसभरात 858 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. वरील आकडेवारीनुसार रुग्ण बरे होण्याच्या तुलनेत नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण दुप्पट आहे आणि हीच जास्त चिंतेची बाब आहे.

आज पुण्यात दिवसभरात उपचारादरम्यान 14 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यातील दोन रुग्ण हे पुण्याबाहेरील आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी पुण्यात 355 कोरोनाबाधितांची प्रकृती चिंताजनक आहे. आज एकूण 1740 नवे रुग्ण आढळल्यानंतर पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या 218202 वर पोहोचली असून आतापर्यंत एकूण 4952 बाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या 201661 एवढी आहे.

पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंत सुरु राहणार आहेत. तसेच लग्न सभारंभ आणि दशक्रिया विधीला 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी दिली जाणार नाही.

पुण्यात काय सुरु, काय बंद?

  • पुण्यात लॉकडाऊन नाही
  • पुणे शहरात रात्रीची संचारबंदी
  • पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू
  • लग्न सभारंभ आणि दशक्रिया विधीला 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी
  • 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद
  • हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंत सुरु राहणार
  • उद्यान एकवेळ बंद राहणार

शेअर करा