पुण्यात आज पहाटे कॅम्प परिसरात भीषण आग, सुदैवाने जीवितहानी टळली

शेअर करा

मुंबईपाठोपाठ आता पुण्यातून आगीची भीषण घटना समोर येते आहे. पुण्यातील कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये बाजारपेठेतील 25 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. मंगळवारी पहाटे ही घटना घडली. या घटनेचे काही व्हिडीओ देखील व्हायरल झालेले आहेत .

पुण्यातील आगीच्या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. हे मार्केट साधारण 70 वर्ष जुनं आहे. पहाटे लागलेल्या आगीमुळे 25 दुकानं जळून खाक झाल्याने मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान जवळपास तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला आता ही आग विझवण्यात यश मिळालं आहे. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

याठिकाणी अग्निशमन दल साधारण तासभर आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. अखेर त्यांना आग विझवण्यात यश मिळालं आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अचानक आग लागल्यामुळे लोकांची तारांबळ उडाली होती.


शेअर करा