‘ … तर ठाकरे आणि सोनू निगमची स्टोरी अख्या महाराष्ट्राला सांगून टाकणार ‘ , निलेश राणेंचा घणाघात

शेअर करा

भाजप आमदार नितेश राणे यांनी युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर सरदेसाई यांनी राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसाणीचा दावा केलाय. याच मुद्द्यावरुन नितेश राणे यांचे भाऊ आणि माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवर सरदेसाई आणि ठाकरे कुटुंबावर सडकून टीका केली आहे. निलेश राणे यांनी देखील यावेळी टीकेची मर्यादा ओलांडली आहे.

निलेश राणे यांनी ट्विटरवर “ठाकरेंचा नातेवाईक वरून खालून सरदेसाई सारखा बेवडा, जूगारडा, मटका छाप म्हणतो अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार. पण मुळात त्यासाठी अब्रू असावी लागते. ठाकरे म्हणे सुसंस्कृत, ह्यापेक्षा मोठा विनोद नाही. ठाकरेंचा सुसंस्कृतपणा ऐकायचा असेल तर जयदेव ठाकरेंना किव्हा सोनू निगमला विचारा”, असा टोला हाणला आहे.

निलेश राणे यांनी आणखी एक ट्विट करत शिवसेनेवर शेलक्या शब्दात टीका केलीय. “ठाकरे आणि त्यांच्या कुत्र्यांनी जास्त नाटक केलं तर ठाकरे आणि सोनू निगमची स्टोरी अख्या महाराष्ट्राला सांगून टाकणार”, असा इशारा निलेश राणे यांनी दिला.

नितेश राणे काय म्हणाले होते ?

सचिन वाझे यांच्यासोबत वरुण सरदेसाई यांचे संबंध असल्याचा दावा भाजप आमदार नितेश राणेंनी केला होता. त्यानंतर वरुण सरदेसाई यांनी नितेश राणेंना कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. सरदेसाईंच्या इशाऱ्यानंतर नितेश राणेंनी देखील पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्ला चढवला असून जुने काही संदर्भ जोडत ‘ आम्हाला आणखी खोलात जायला लावू नका ‘ अशा प्रकारे एक इशाराच शिवसेनेला दिला आहे .

नितेश राणे यावेळी म्हणाले, ‘ तपासयंत्रणांनी सचिन वाझे आणि वरुण सरदेसाईंच्या संबंधांचा तपास करावा म्हणून मी माहिती उघड केली. पण तुम्ही तुमच्याकडे असलेली माहिती तपास यंत्रणांकडे पोहोचवाल तर आम्ही तुमच्या विरुद्ध नोटीस काढून तुमच्यावर कोर्टाचा दबाव टाकू, असा धमकवण्याचा प्रयत्न आहे. सरदेसाई वाझेंना ओळखतात की नाही? त्यांच्यासोबत फोनवरुन संभाषण झालंय की नाही ? याबद्दल ते पत्रकार परिषदेत काहीच सांगितलं नाही. आमच्या कुटुंबावर खालच्या पातळीचे आरोप केले तर तुमची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू,’

‘आम्ही ३९ वर्ष बाळासाहेब ठाकरेंची सेवा केली आहे त्यामुळं शिवसेनेची सगळी प्रकरणं आम्हाला माहिती आहेत. आम्हाला तोंड उघडायला लावायचं असेल तर रमेश मोरे, सोनू निगम, चंदू पटेल, नंदकुमार चतुर्वेदी असे अनेक विषय बाहेर काढायची तयारी असेल तर पाठवा आम्हाला कायदेशीर नोटीस. त्यामुळं आम्हाला धमकी देऊ नये,’ असा इशारा नितेश राणेंनी दिला आहे.

वरुण सरदेसाई यांनी अब्रुनुकसाणीचा दावा केल्यानंतर नितेश राणे यांनी देखील निशाणा साधला. “अब्रुनुकसाणीचा दावा ठोकल्यानंतर धमकी नेमकी कुणाला देताय? आमची पार्श्वभूमी आणि शिक्षण हे सांगण्यासाठी आम्ही समाजकारण आणि राजकारणात नाही आहोत. अशा पद्धतीच्या नोटीसींना भीक घालत नाही”, असा घणाघात नितेश राणे यांनी केला आहे.

वरुण सरदेसाई यांची काय आहे भूमिका ?

सचिन वाझे प्रकरणी कालच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी वरुण सरदेसाई यांच्यावर आरोप केले होते. आयपीएल बेटिंगप्रकरणात वाझेंनी सट्टेबाजांना खंडणी मागितली होती. तर सरदेसाई यांनी वाझेंकडे पैशाची मागणी केली होती, असा आरोप राणे यांनी केला होता. त्यावर सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन सात दिवसात पुरावे जाहीर करा अथवा माफी मागा, नाही तर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार, असा इशारा सरदेसाई यांनी दिला होता.

राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे दाखल आहे, खुद्द फडणवीसांनीच हे मांडलय, आज ते भाजपमध्ये गेलेत तर महाविकास आघाडीतील विविध नेत्यांवर आरोप करत आहेत. गेले काही दिवस ते माझ्यावर वैयक्तिकरीत्या आरोप करत आहेत. राणे कुटुंबीयांना जनता अजितबात गांभीर्यानं घेत नाही. त्यांना भीक घालत नाही, असे वरुण सरदेसाई यांनी म्हटले होते

त्यांनी जे आरोप केलेत, ते सिद्ध करावेत नाही तर कायदेशीर प्रक्रियेला तयार राहावे, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर अतिशय घाणेरडे आरोप केलेत. ते सगळे आरोप तथ्यहीन असून, त्या आरोपांमुळे मी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकत आहे, असेही वरुण सरदेसाई यांनी सांगितले होते.


शेअर करा