पुण्यात संपूर्ण लॉकडाऊन ? महापौरांनी दिली महत्वाची माहिती

  • by

पुण्यात कोरोना रुग्णांची आकडा वाढत आहेत. दरम्यान, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी (ता.17) शहरात पुर्ण लॉकडाऊन लागू करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी सध्या शहरात तपासणी आणि चाचणी वाढवली आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महापौर मुरलीधर मोहोळ पुढे म्हणाले, ”आम्ही शहरात सुक्ष्म विलगीकरण क्षेत्र (Micro Containment Zone) केले आहेत. तसेच तपासणी आणि चाचण्याची प्रमाण वाढवले आहे. त्यामुळे संपुर्ण लॉकडाऊनची सध्या गरज नाही” अशी माहिती त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेला मोहोळ यांनी दिली. पुण्यात 84 कोरोना प्रतिंबधक लसीकरण केंद्र आहेत. दरम्यान पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात 3,574 नवीन रुग्ण आढळले आहेत. 443822 एकुण सक्रिय रुग्णांची संख्या आहेत. तर 9440 एकुण मृतांची संख्या आहेत.

पुणे काल दिवसभरातील कोरोना स्थिती

  • नवीन रुग्ण : 3,574
  • बरे झालेले रुग्ण : 1,577
  • 24 तासात झालेले मृत्यू : 12 deaths in the last 24 hours
  • अॅक्टिव्ह रुग्ण 24,204
  • बरे झालेल्या रुग्णांची संख्या : 4,10,347
  • मृतांची संख्या : 9,440