नागपूर हादरले ..मॉलच्या पार्किंगमध्ये पोलिसाच्या मुलाचा मृतदेह आढळला

शेअर करा

नागपूर येथील सीताबर्डी परिसरातील फॉरच्यून मॉलच्या पार्किंगमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळल्यामुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या शहरात लॉकडाऊन सुरु असल्यामुळे नागरिकांची येथे कुठलीही वर्दळ नाही. मात्र असे असूनसुद्धा मॉलच्या पार्किंगमध्ये युवकाचा मृतदेह आढळल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. प्राथमिक माहितीनुसार हा मृतदेह एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा असून त्याचे नाव अभिषेक बघेल असे आहे

उपलब्ध माहितीनुसार, नागपूरमध्ये सीताबर्डी परिसरात एक फॉरच्यून नावाचा मॉल आहे. सध्या शहरात लॉकडाऊन असल्यामुळे हा परिसर सामसूम आहे. दरम्यान मॉलच्या पार्किंमध्ये एका युवकाचा मृतदेह आढळलाय. हा मृतदेह एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा असून त्याचे नाव अभिषेक बघेल असल्याचे सांगितले जात आहे. लॉकडाऊन असल्यामुळे या भागात कुठलीही वर्दळ नाही. मात्र, तरीही मॉलच्या पार्किंगमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.

अभिषेक बघेल या युवकाचे वय जास्त नसल्यामुळे त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला असावा, याचे अनेक कयास लावले जात आहेत. मॉलच्या पार्किंगमध्ये एवढ्या आतमध्ये मृतदेह आढळल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अजूनतरी या युवकाच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला असावा हे समजू शकलेले नाही.


शेअर करा