नागपुरात कोरोना परिस्थिती भयावह..जाणून घ्या आताची परिस्थिती ?

शेअर करा

अनलॉकनंतर वाढलेली गर्दी, ठिकठिकाणी होणारा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, विनामास्क लोकलमध्ये वावर यांसह इतर कारणांमुळे राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा विस्फोट पाहायला मिळत आहे. रुग्णांचा चढता आलेख पाहून राज्यातील आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. यामुळे राज्य सरकारकडून ठिकठिकाणी निर्बंध लावले जात आहेत.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहे. राज्यातील सर्व खासगी कार्यालय आणि आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचारीही संख्या ठेवा, अशी सूचना करण्यात आली आहे. तसेच धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही, अशी सूचना देण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या कोरोना नव्या सूचना

  • राज्यातील सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचारी संख्या ठेवा
  • नाट्यगृहे आणि सभागृहे यामधील उपस्थिती देखील 50 टक्के संख्या असावी
  • आरोग्य आणि अत्यावश्यक सेवा तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळण्यात आलं
  • सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या विभाग आणि कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे
  • धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही

नागपुरात कोरोना परिस्थिती भयावह

नागपुरात कोरोनाची धडकी भरविणारी स्थिती पाहायला मिळत आहे. नागपूरमध्ये गेल्या 24 तासात 35 मृत्यू झाल्याने आणखी चिंता वाढली आहे. या वर्षातील मृत्यूचा हा उच्चांक आहे. तर काल दिवसभरात नागपुरात 3235 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल दिवसभरात नागपुरात 16 हजार o66 चाचण्या करण्यात आल्या होत्या. नागपुरातील बरे होणाऱ्यांचे प्रमाण 83.78 एवढे टक्के आहे. सद्यस्थितीत नागपुरात अॅक्टिव्ह रुग्ण 25 हजार 569 एवढे आहेत.

याच पार्श्वभूमीवर नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत आज कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेणार आहे. यावेळी ते सर्व जनप्रतिनिधींसोबत बैठक करणार आहे. या बैठकीत नागपुरात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्येचा आढावा घेतला जाणारआहे. तसेच नागपुरात 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन आहे. मात्र आता ते वाढणार का? याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.


शेअर करा