‘ आम्ही या भागातील डॉन हफ्ता टाक,’ नगरमध्ये भर दुपारी रंगला थरार ..

शेअर करा

‘आम्ही या भागातील डॉन आहोत. दुकान चालवायचे असेल तर आम्हाला हप्ता द्या,’ असे म्हणत एका टोळक्याने बालिकाश्रम रोडवरील दोघा दुकानदारांना मारहाण करत त्यांच्याकडील पैसेही हिसकावून नेल्याची घटना घडलेली असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका कापड दुकानदाराला आणि सायकलीचे दुकान चालविणाऱ्याला या टोळीने लुटल्याची घटना घडलेली आहे.

नगर शहरातील बालिकाश्रम रोड या वर्दळीच्या ठिकाणी ही घटना शनिवारी भरदिवसा घडली. अक्षय राजेंद्र जाधव यांनी याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाधव यांचे कापड दुकान आहे. दुपारच्या सुमारास ते दुकानात असताना एका कारमधून आलेल्या गुंडानी त्यांना धमकावले. दुकानात प्रेम विठ्ठल नन्नावरे, मुकुंद कांबळे होते. त्यांना देखील या गुंडानी दमदाटी केली.

आम्ही या भागातील डॉन आहोत, हप्ता द्यावाच लागेल, असे म्हणून दंडुक्याने मारहाण केली. काउंटरमधील तीन हजार पाचशे रुपये आणि मोबाइल हिसकावून गुंड निघून गेले. दुकानातील कामगारांनाही त्यांनी मारहाण केली. त्यानंतर हे गुंड शेजारील सायकल दुकानात गेले. तेथे दुकानदार प्रवीण ठकसेन साळवे यांनाही धमकावले. त्यांच्याकडील पाच हजार रुपये हिसकावून घेतले. त्यांनाही लाकडी दांडक्यांने मारहाण केली. त्यानंतर गुंड निघून गेले.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे आधीच व्यावसायावर अनेक बंधने आली आहेत. त्यामुळे व्यावसायिक अडचणीत आहेत. विविध सार्वजनिक उत्सवांच्यावेळी देखील दुकानदारांना अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मार्गाने सक्तीच्या वर्गणी वसुलीला सामोरे जावे लागते. उत्सव बंद आहेत. मात्र काहीतरी कारण पुढे करून हप्त्यांसाठी गुंडांच्या टोळ्यांचा उपद्रव सुरूच आहे. नागरिक व्यवसाय त्याच भागात असल्याने तक्रार करत नाहीत मात्र अशाने गुंड डोकावत चाललेले आहेत .


शेअर करा