लेडी डॉन प्रीती दासच्या कपाटात आढळल्या ‘ अशा ‘ गोष्टी की पोलीस देखील गेले चक्रावून

शेअर करा

लेडी डॉन प्रीती दासचे एक एक कारनामे बाहेर येत असल्याने तिच्या ह्या गुन्ह्यात तिची साथ देणाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहे . यात पोलीस अधिकारी, सरकारी कर्मचारी यांचा देखील समावेश आहे तर तिचे नेहमीचे मर्जीतले पंटर डुबऱ्या अमित, पत्रकार शीतल, प्राजक्‍ता बंगाली, रवी आणि शारिक ट्रेलर हे सर्व पोलिसांकडून उचलले जाण्याच्या भीतीने अंडरग्राउंड झाल्याची चर्चा नागपूर शहरात आहे.

प्रीती दासवर सीताबर्डी पोलिस ठाण्यात फसवणुकीचे दोन गुन्हे, पाचपावली, लकडगंज, जरीपटका आणि भंडारा जिल्ह्यातही गुन्हे दाखल आहेत. प्रीती दासने गंडा घालण्यासाठी तसेच वसुली करण्यासाठी डुबऱ्या अमित, पत्रकार शीतल, प्राजक्‍ता बंगाली, रवी आणि शारीर ट्रेलर अशी ब्लॅकमेलर गॅंग बनविली होती. या टोळीने आतापर्यंत शेकडो धनिकांना जाळ्यात ओढले आणि खंडणी स्वरूपात लाखो रुपये उकळले. प्रीती दासची टोळी गुन्हे दाखल होईपर्यंत तिच्यासोबत होती मात्र, आता पोलिसांनी प्रीतीवर मोक्‍का लावण्याची यंत्रणेने तयारी केल्याने टोळीतील सर्व पंटर गायब झाले आहेत .

प्रीती कायद्याच्या कचाट्यात अडकताच तिच्या सर्व पाठीराख्यानी तिची साथ सोडली आहे त्यामुळे तिने, ” हम तो डुबेंगे सनम तुमको भी लेकर ” अशा खास शब्दात फोनवर तिच्या पाठीराख्यांना धमकी दिल्याची देखील चर्चा आहे . कित्येक राजकीय पदाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांना प्रितीने आपल्या कौशल्याने आपल्या जाळ्यात ओढले होते. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून लाखोंनी लुटल्याचे समोर आले आहे. मात्र, प्रीतीकडे फोटो आणि व्हिडिओ असल्याने इभ्रतीचा “भाजीपाला’ होऊ नये म्हणून कोणताही राजकीय पदाधिकारी आणि पोलिस अधिकारी प्रीतीच्या ब्लॅकमेलिंगबाबत शब्दही बोलायला तयार नाही इतकेच काय तर इलेक्ट्रॉनिक मीडिया देखील ह्या विषयावर जास्त बोलायला तयार नाही .

दरम्यान, पाचपावली पोलिसांनी प्रीती दासच्या अनेक घरांपैकी एका घराची झडती घेतली.प्रीतीच्या कपाटात असलेल्या इतक्या महागड्या साड्या बघून पोलिसही चक्रावून गेले. प्रीतीकडे एवढ्या महागड्या साड्या आणि फॅन्सी ड्रेस आले कुठून ? असा प्रश्‍न पोलिसांना पडला आहे. तिच्या उत्पन्नाचे आर्थिक स्रोत काय आहेत यावर पोलिसांचे आता बारीक लक्ष आहे तसेच तसेच प्रीतीने कमावलेली कोट्यवधींची माया कोणाच्या नावावर केली याचा देखील पोलीस बारकाईने शोध घेत आहेत. पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे प्रीतीच्या खऱ्या लाभार्थ्यांची नावे उघड केली तर अनेक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे .

सुनील पौनीकर या युवकाच्या पत्नीला देहव्यापारात ढकलून धंदा करवून पैसे वसूल करेल अशी धमकी प्रीतीने चक्क दोन पोलिसांच्या उपस्थितीत दिली होती. हा अपमान सहन न झाल्याने पौनीकरने आत्महत्या केली. याप्रकरणी तब्बल सहा महिन्यानंतर प्रीतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा लकडगंज पोलिसांनी दाखल केला होता. मात्र, आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असताना प्रीती दासला लगेच जामीन मिळाल्याने पोलिस आणि सरकारी वकिलाच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. लकडगंज पोलिस “मॅनेज ‘ झाल्याची चर्चा शहरभर आहे.


शेअर करा