विद्यापीठ परिसरात शिक्षक आणि कर्मचारी पाहत होते ‘ नको ते ‘, 2 महिलांचाही समावेश

शेअर करा

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या जिवाजी विद्यापीठात एक धक्कादायक बाब समोर आली असून विद्यापीठ परिसरात शिक्षक आणि कर्मचारी यांच्यासह एकूण 8 जण पॉर्न फिल्म पाहत असल्याचं समोर आलंय. या 8 जणांपैकी 2 महिला देखील असल्याचे समजते तर एक 58 वर्षाचा वृद्ध व्यक्ती आहे. या प्रकाराची माहिती सर्वत्र पसरल्यानंतर विद्यापीठात एकच खळबळ माजली आहे.

विद्यापीठाची प्रतिमा यामुळे मलिन होत असल्यामुळे विद्यापीठाने 2 महिलांसह 4 जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यात पर्मनंट असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.जीवाजी विद्यापीठातील हा सर्व प्रकार नॅशनल नॉलेज नेटवर्कने उघडकीस आणलाय. NKN ने विद्यापीठ प्रशासनाला माहिती दिली की त्यांच्या विद्यापीठात 8 यूजर आयडीवरुन 2 दिवसांत जवळपास 21 तास पॉर्न वेबसाईट सर्च करण्यात आली आहे.

प्रत्येक दिवसाचा हिशेब काढल्यास दिवसाला 179 मिनिटे फक्त वेबसाईट सर्च केल्या गेल्या नाही तर त्यावर थांबून कंटेन्टही पाहिला गेला आहे. इतकच नाही तर या कर्मचाऱ्यांनी आपल्या फोन मध्ये पॉर्न फिल्म्सही डाऊनलोड केल्याची माहिती NKN ने दिली आहे. या प्रकारानंतर जीवाजी विद्यापीठात एकच हलकल्लोळ माजला आहे.

विद्यापीठ परिसरात पॉर्न फिल्म पाहणाऱ्या 8 कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये 2 व्यक्ती असेही आहेत, ज्यांचं वय 58 वर्षाच्या जवळपास आहे. ते आता निवृत्तीला आले आहेत. विद्यापीठ प्रशासनाने या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसला उत्तर देताना काही कर्मचाऱ्यांनी आपण अन्य वेबसाईट सर्च करत होतो, तेव्हा अचानक पॉर्न वेबसाईट आपोआप ओपन झाल्या, असा खुलासा दिला आहे. अशा प्रकारच्या वेबसाईट सर्च करणाऱ्यांमध्ये 2 महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

या प्रकारानंतर विद्यापीठ प्रशासनाने कठोर पाऊल उचललं आहे. विद्यापीठाने सर्व्हिस प्रोव्हायडरचे 4 कर्मचारी कपिल सेन, अनुराग शर्मा आणि दोन महिलांना कामावरुन काढून टाकलं आहे. तर फॅकल्टी टिचर हीरेंद्र यांना कम्प्यूटर सायन्स डिपार्टमेंटमधून हटवलं आहे. तर स्थायी कर्मचारी रिशेष रजक याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.


शेअर करा