बायकोचा प्रियकर घरी आल्यावर देखील तो शांतच होता, रात्री ३ वाजता ‘ घडले असे ‘ की …

शेअर करा

कर्नाटकाच्या बंगळुरु येथील बयादरहल्ली येथे एका 31 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हत्या करण्यााधी आरोपी घरात सहा तासांपेक्षा जास्त वेळ एका खाटखाली दबा धरुन बसला होता. त्यानंतर संधी साधून त्याने हत्या केली. आरोपीचं नाव कारपेंटर भरत कुमार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

आरोपी भरतने आठ वर्षांपूर्वी विनुथा नावाच्या तरुणीसोबत लग्न केलं होतं. दोघांना दोन लहान मुलंदेखील आहेत. त्यांचा संसार सुखाने सुरु असताना त्यांच्या आयुष्यात अचानक शिवराज नावाचा तरुण आला. हा शिवराज भरतची पत्नी विनुथाचा मित्र होता. तो नोकरी शोधण्याच्या निमित्ताने विनुथाजवळ आला. त्याचं विनुथावर प्रेम होतं. त्याने विनुथाकडे आपलं प्रेम देखील व्यक्त केलं होतं . सुरुवातीला विनुथाने त्याच्या प्रेमाच्या प्रस्तावाला नाकारलं होतं मात्र नंतर काही दिवसांनी त्यांच्यात ‘ इलू इलू ‘ सुरु झालं.

विनुथा आणि शिवराज यांच्या प्रेमसंबंधाची माहिती भरतला मिळाली. त्यानंतर भरतला शिवराजचा प्रचंड राग आला. याशिवाय त्यांच्या या प्रेमसंबंधांमुळे आपला संसार उद्ध्वस्त होईल, अशी भीती त्याला वाटली. त्यामुळे त्याने शिवराजचा काटा काढण्याचं ठरवलं. भरत हा बुधवारी (24 मार्च) रात्री 9 वाजता त्याच्या घरात शिरला. त्यानंतर तो घरात असलेल्या एका खाटेखाली लपून बसला.

शिवराज रात्री आपल्या घरी येतो याची त्याला माहिती झाली होती . रात्री जवळपास साडेदहा वाजेच्या सुमारास शिवराज तिथे आला. विनुथाने शिवराजला जेवण दिलं. त्यानंतर दोघं झोपायला गेले. या दरम्यान भरत हा खाटेखाली चोरुन त्यांचे सर्व चाळे पाहत होता. मध्यरात्री तीन वाजता भरतची पत्नी विनुथा बाथरुमला गेली. त्यानंतर भरतने बाथरुमच्या दरवाज्याची कडी बाहेरुन लावली. त्यानंतर त्याने शिवराजच्या पोटात चाकू खोपसून त्याची हत्या केली. पत्नी आल्यानंतर तिने आरडाओरडा केला आणि लोक जमा झाले .

संबंधित घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस तातडीने तिथे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी भरतला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपली चूक मान्य केली. याशिवाय आपला संसार सुरळीतपणे सुरु राहावा यासाठी हत्या केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. भरतची सध्या मेडिकल तपासणी सुरु आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून योग्य कारवाई करु, असं त्यांनी सांगितलं आहे.


शेअर करा