मोदीजी कुठं लपलात ? आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी उभे, बाहेर या घाबरू नका

  • by

चिनी सैन्याकडून भारतीय जवानांच्या केलेल्या हत्येनंतर देशात पूर्ण शोककळा पसरली आहे . चिनी सैन्याचे देखील नुकसान झाले आहे असे सांगण्यात आले असले तरी चीनने याबदल अद्याप तरी कोणतीही माहिती उघड केली नाही. लहान सहान गोष्टीवरून ट्विटरवर सक्रिय राहणाऱ्या मोदींनी शहीद झालेल्या जवानांना अद्याप देखील ट्विटरवर श्रद्धांजली वाहण्याचे देखील सौजन्य दाखवलेले नाही, अशीच परिस्थिती अमित शाह यांची देखील आहे, त्यांच्या देखील ट्विटर हँडलवर शहीद जवानांसाठी एक शब्द देखील लिहलेले नाही. संपूर्ण देशभरात चीनच्या विरोधात संतापाचे वातावरण आहे. अशा पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका ट्विटद्वारे देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

आपल्या ट्विटमध्ये माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लिहितात की, ‘देशातील शूर शहीदांना माझा सलाम’ राहुल यांनी आपल्या ट्विटसह एक व्हिडिओही शेअऱ केला आहे. दोन दिवसांपूर्वी भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. कुटुंबातील छिनले. चीनने आमची जमीन हडप केली. पंतप्रधान तुम्ही गप्प का आहात? तुम्ही कुठे लपले आहात ? बाहेर या. संपूर्ण देश, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी उभे आहोत. बाहेर या आणि देशाला सत्य सांगा, घाबरू नका, असे राहुल गांधी यांनी या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले आहे.

राहुल गांधी यांच्यानंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या मुद्द्यावर आवाहन केले आहे. ” आमची धरती माता, आमचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे. आमचे जवान शहीद होत आहेत, असे सांगत काय आम्ही गप्प बसणार आहोत?, असा सवाल प्रियांका गांधी यांनी मोदींना विचारला आहे. या प्रकरणातील सत्य काय आहे, हे जाणून घेण्याचा भारतीय जनतेला हक्क आहे. कुणी आमची जमीन हडप करण्यापूर्वीच आपले प्राण अर्पण करेल अशा नेतृत्वाची भारतीय जनतेला गरज आहे असे म्हणत पंतप्रधान मोदी पुढे या, चीनचा सामना करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन प्रियांका गांधी यांनी मोदींना केले आहे.

देशात इतकी भयावह परिस्थिती असताना देखील मोदींनी अद्याप एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही . देशात कोरोना आणि चीन हे मोठे प्रश्न आ वासून असताना पंतप्रधान कुठे गायब आहेत तेच नागरिकांना समजेनासे झालेले आहे .