ब्रेड तयार करण्यासाठी आता महिलांच्या लघवीचा वापर, वाचा नेमका प्रकार काय?

शेअर करा

ब्रेड तयार करण्यासाठी चक्क महिलांच्या लघवीचा उपयोग होत असल्याचे आढळून आले असून त्यासाठी लुईस रॅगुट नावाची महिला वेगवेगळ्या स्वच्छतागृहांमधून चक्क महिलांची लघवी जमा करतेय. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण ब्रेड तयार करण्यासाठी फ्रान्समध्ये चक्क महिलांच्या लघवीचा उपयोग होतोय. त्यासाठी लुईस रॅगुट नावाची महिला वेगवेगळ्या स्वच्छतागृहांमधून चक्क महिलांची लघवी जमा करत आहे.

लुईस रॅगुट या महिलांच्या लघवीमध्ये अनेक पोषक घटक असल्याचा दावा करतात, एवढंच नाही तर ब्रेडचे पौष्टिकत्व वाढवण्यासाठी महिलांच्या लघवीचा उपयोग होऊ शकतो, असेही त्या म्हणतात. महिलांच्या लघवीच्या मदतीने तयार केल्या जाणाऱ्या ब्रेडला या महिलेने ‘गोल्डीलॉक ब्रेड’ असे नाव दिले आहे. लुईस या ब्रेड तयार करण्यासाठी महिला स्वच्छतागृहांमधून न चुकता रोज लघवी जमा करतात. लघवीवर योग्य प्रक्रिया करून नंतर त्या ब्रेड तयार करण्यासाठी लघवीचा उपयोग करतात.

लुईस यांना याबद्दल विचारले असता विज्ञानाचा अधार घेत त्या महिलांच्या लघवीमध्ये अनेक पोषक घटक असल्याचे सांगतात. लघवीमध्ये नायट्रोजन, पोटॅशियम असे अनेक मुलद्रव्य असातात, असे त्या सांगतात.फ्रान्सच्या शहर नियोजन विभागाने सांगितल्याप्रमाणे, लघवीचा उपयोग करुन दिवसाला तब्बल 2 कोटी 90 लाख ब्रेड तयार केले जाऊ शकतात. तसेच जर लघवीचा उपयोग केला तर दिवसाला तब्बल 703 टन नायट्रोजन वाचवता येईल, असेही फ्रान्सच्या शहर नियोजन विभागाने सांगितलंय. लुईस रॅगुट या त्यांच्या प्रयोगाबद्दल सोशल मीडियावरसुद्धा वेळोवेळी बोलत असतात. या अभिनव प्रयोगाची पूर्ण विश्वात चर्चा होत आहे.


शेअर करा