खाजगी फोटो व्हायरल करू म्हटल्यावर विवाहिता पैसे द्यायला झाली तयार पण होता ‘ वेगळाच ‘ प्लॅन

शेअर करा

आधी त्यांनी वेगवेगळे टेक्निक वापरून पीडित विवाहित महिलेचा मोबाईल हॅक केला. एकदा मोबाईल हॅक झाल्यावर त्यांनी महिलेचे व्हाट्सऍप व मोबाईल मधील गॅलरीतील काही खाजगी फोटो प्राप्त केले. त्यानंतर त्यांनी हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊन पैसे मागायला सुरु केले . महिलेने पैसे देण्याचे देखील कबूल केले मात्र सर्व काही आरोपींनी ठरवल्यासारखे झाले नाही . बातमी अमरावती जिल्ह्यातील अंजनगावसूर्जी येथील आहे.

आदित्य पाटील, प्रज्ज्वल भाष्कर व आदित्य अस्वार अशी अटक केलेल्या युवकांची नावे असून दुर्दैवाने तिघेही विद्यार्थी आहेत. या युवकांनी एका विवाहित महिलेच्या मोबाईलवर 8 जून रोजी पहिल्यांदा कॉल केला आणि महिलेला धमकी दिली की, ” तुझे काही खाजगी फोटो आमच्याकडे असून जर आमचे म्हणणे मान्य केले नाही तर आम्ही तुझी सोशल मीडियावर बदनामी करू. आमच्याकडे असलेले तुझे सगळे फोटो व्हायरल करू, जर तुला ह्या बदनामीपासून वाचायचे असेल तर तीन लाख पन्नास हजार रुपयांची खंडणी द्यावी लागेल ” . पोलिसात किंवा इतर कुठे गेलीस तर विवाहितेसह तिच्या पतीला देखील जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिल्याचे पिडीतेचे म्हणणे आहे .

पैसे उकळवण्याचा असा होता प्लॅन मात्र ?

आरोपी महिलेस फिल्मी स्टाईलने शुक्रवारी (ता. 12) मध्यरात्री एका दुचाकीवर पैशाची थैली ठेवण्यास सांगितले. काही वेळातच आरोपी तिथे पोहचले आणि आरोपींनी पैशाची थैली उचलून पळ काढला मात्र तक्रारदारानी त्यांचा पाठलाग केला. काही काळ पाठलाग केल्यावर ते दुचाकी सोडून पळाले. मात्र ज्या तीन मोबाईल क्रमांकावरून त्यांनी महिलेशी संपर्क त्याच्या आधारे महिलेने पोलिसात तक्रार दिली आणि पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल होताच काही वेळातच पोलिसांना तिघांनाही धरण्यात यश आले असून ज्या मोबाईलचा वापर त्यांनी गुन्हयात केला आहे ते देखील जप्त करण्यात आले आहेत . पोलिसांच्या या तात्काळ कारवाईबद्दल त्यांचे परिसरात कौतुक होत आहे .


शेअर करा