राज्यातील आजची आकडेवारी चिंताजनक, जाणून घ्या आपल्या जिल्ह्यातील परिस्थिती ?

शेअर करा

महाराष्ट्रात दररोज नव्या करोना बाधित रुग्णांचा आकडा कमालीची वाढत असून आज पुन्हा एकदा नव्या करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत तो ५० हजारांच्या आसपास सरकू लागला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४९ हजार ४४७ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ४७ हजार ८२७ इतकी होती. कालच्या तुलनेत ही वाढ १ हजार ६२० ने अधिक आहे, ही चिंतेची बाब आहे.

गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३७ हजार ८२१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ही संख्या २४ हजार १२६ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाख ०१ हजार १७२ वर जाऊन पोहचली आहे. आज राज्यात एकूण २७७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या २०२ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८८ टक्के इतका आहे. याबरोब राज्यात आज ३७ हजार ८२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २४ लाख ९५ हजार ३१५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.४९ टक्क्यांवर आले आहे.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ लाख ०१ हजार १७२ इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७३ हजार ५९९ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ६० हजार ८४६ इतका आहे. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ५२ हजार ४०८ इतकी झाली आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ४८ हजार ६६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३१ हजार ५१२ इतकी आहे. औरंगाबादमध्ये १४ हजार ३०२, अहमदनगरमध्ये १२ हजार ८८१ इतकी आहे. तसेच नांदेडमध्ये ही संख्या १० हजार ७०२ इतकी आहे. जळगावमध्ये ७ हजार ६४१, तर रायगडमध्ये एकूण ५ हजार २५१ इतके सक्रिय रुग्ण आहेत.


अमरावतीत ही संख्या ३ हजार ४४०, तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ९५१ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात आहे. गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ४९७ इतकी आहे.


शेअर करा