प्रियकराचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, प्रेयसीने त्याचे गुप्तांगच कापले जेणेकरून …

  • by

प्रियकराने प्रेयसीला धोका दिल्यामुळे ब्रेकअप होतात, काही वेळेस मारहाणीचे प्रसंग घडतात. मात्र तैवानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गाढ झोपेत असलेल्या प्रियकराचे गुप्तांगच कापले. प्रियकराचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते, त्यामुळे चिडलेल्या प्रेयसीने हे कृत्य केले. या आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

उपलब्ध वृत्तानुसार, पीडित व्यक्तीचे नाव हुआंग (५२ वर्ष) आहे. तैवानमधील चान्घुआ काउंटीमधील शीहु टाउनशीपमध्ये तो राहत होता. घटना घडली तेव्हा तो त्याच्याच घरी होता. हुआंगला तीन मुले देखील आहेत. हुआंगच्या घरी आरोपी महिला आली. त्या दोघांमध्ये वादावादी देखील झाली. त्यानंतर हुआंग मद्यपान करून जेवून गाढ झोपी गेला.

रात्री जाग आल्यानंतर त्याला गुप्तांग २० टक्के कापले असल्याचे लक्षात आले. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता. जखमेमुळे त्याला वेदनाही जाणवत होत्या. स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या कात्रीने आरोपी महिलेने प्रियकराचे गुप्तांग कापले. इतके सगळे होईपर्यंत पीडित प्रियकर कुठल्या धुंदीत होता हे समोर आलेले नाही .

आरोपीने कापलेल्या गु्प्तांगाचा भाग टॉयलेटमध्ये टाकून फ्लश केला. जेणेकरून शस्त्रक्रिया करून हा भाग पु्न्हा जोडता कामा नये. या घटनेनंतर आरोपी प्रेयसीने स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर राहून गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी प्रियकराला रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांनी घराबाहेरून रक्ताने माखलेली कात्रीदेखील जप्त केली आहे. पोलिसांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यानंतरही जखमी चालत होता. उपचारासाठी आणखी काही दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया केली. आरोपीने प्रियकराचे लिंग १.५ सेमी भाग कापला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.