… आधी मृत्यूची घोषणा अन आज जिवंत समाधीसाठी ‘ कार्यक्रम ‘ , कुठे चाललाय प्रकार ?

शेअर करा

गुजरातमधील मेहसानाचे महंत परमार यांनी आजच्याच दिवशी तीन वर्षांपूर्वी स्वतःच्या मृत्यूची घोषणा केली होती. चार एप्रिल 2021 ला आपण देहत्याग करणार असल्याचं त्यांनी 2018 मध्ये आजच्याच दिवशी घोषित केलं होतं. आता यासाठीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. कबीर धाममधील महंतांच्या अनुयायांनी त्यांची समाधी बनवण्यास सुरुवात केली असून आज ते समाधी घेणार असल्याचे होर्डिंगही लागवण्यात आलेले आहेत . जिवंत व्यक्तीच्या समाधी घेण्यास कायद्याने बंदी असून देखील हा प्रकार करण्यात येणार असून चक्क मोदींच्या गुजरातमध्ये हे घडत असून मीडिया चिडीचूप आहे .

महंत परमार रात्री 10 ते अकरा वाजेच्या सुमारास समाधी घेणार असल्याचा दावा केला जात आहे. यासाठी त्यांच्या आश्रमात सकाळपासूनच तयारी सुरू झाली आहे. आश्रमात सकाळपासून विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. हे कार्यक्रम समाधी घेईपर्यंत सुरूच राहातील असं सांगण्यात आलं आहे. ह्या कार्यक्रमाचे होर्डिंग देखील गुजराथमध्ये लावण्यात आले आहेत .

सदर महंत हे मूळचे अहमदाबादच्या रामपेर्नो टेक्रो येथील रहिवासी आहेत. राजू परमार असं त्यांचं नाव आहे. परमार यापूर्वी एएमसी निवडणूक लढले होते आणि त्यांना पराभव पत्करावा लागला होता. गेली अनेक वर्षे ते मेहसानाच्या कबीर आश्रमात होते. परमार यांचा जन्म 4 एप्रिल 1971 रोजी झाला होता. आपल्या जन्माच्या दिवशीच ते समाधी घेत आहेत. रात्री दहा ते अकराच्या दरम्यान समाधी घेणार असल्याचंही त्यांनी स्वतःच सांगितलं आहे.


शेअर करा