झूम मिटिंग दरम्यान नेत्याची पत्नी ‘ नको त्या ‘ अवस्थेत दिसल्याने खळबळ , कुठे घडली घटना ?

  • by

कोरोनामुळे आता बहुतेक लोक घरुनच ऑनलाईन पद्धतीनं आपलं काम करताना दिसतात. सरकारी अधिकारी आणि नेत्यांची मीटिंगही झूम अॅपद्वारे ऑनलाईनच होताना जगभरात दिसत आहे मात्र या झूम मीटिंगदरम्यान अनेकदा विचित्र घटना घडल्या आहेत. दक्षिण आफ्रिकामध्ये झालेल्या या झूम मीटिंग दरम्यान कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावरील चर्चेसाठी चाललेल्या मीटिंगमध्ये नेत्याची पत्नी विना कपडे आपल्या पतीच्या मागे येऊन उभा राहिली.

सदरचे दृश्य पाहून सर्वजण चकित झाले आणि मीटिंगमधील उपस्थित नेत्यांनी आणि खासदारांनी त्यांना त्याचवेळी सांगितलं, की त्यांती पत्नी नग्न अवस्थेत सर्वांना आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेत 23 पारंपरिक नेत्यांची संस्था नॅशनल हाऊस ऑफ ट्रेडिशनल लिडर्सचे एक सदस्य Xolile Ndevu मंगळवारी एका बैठकीदरम्यान कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत चर्चा करत होते. श्यावलेले नडेवू सांगत होते की पूर्व कॅपटाउनमध्ये डॉक्टरांसोबत मिळून त्या कशाप्रकारे काम करत आहेत. याचदरम्यान अचानक त्यांची पत्नी विना कपडे त्यांच्या मागे दिसू लागली.

मीटिंगमध्ये असणाऱ्या एका नेत्यानं त्यांना सांगितलं, की तुमच्या पाठीमागे जी महिला उभी आहे, तिनं व्यवस्थित कपडे घातलेले नाहीत. आम्ही सगळं पाहात आहोत. तुम्ही त्यांना सांगितलं नाही का की तुम्ही मीटिंगमध्ये आहात. हे अत्यंत वाईट आहे, जे आम्ही पाहात आहोत. जेव्हा श्यावलेले नडेवू यांना या गोष्टीची माहिती झाली तेव्हा त्यांनी आपला चेहरा हातानंच झाकून घेतला आणि ते माफी मागू लागले. मला गोष्टीसाठी अत्यंत वाईट वाटत आहे. माझं लक्ष कॅमेऱ्यावरच केंद्रीत होतं आणि मी मागे पाहिलंच नाही, अशा शब्दात त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

दुसऱ्या दिवशी त्यांनी या प्रकाराबद्दल आणखीन स्पष्टीकरण दिले आणि ते म्हणाले की, ‘ ही टेकनिक आमच्यासाठी नवीन आहे आणि याबद्दल आम्हाला प्रशिक्षणही देण्यात आलं नाही. घरच्यांसाठीदेखील हे नवीनच आहे, त्यामुळे आम्ही हे चांगल्या पद्धतीनं शिकून प्रायवसी ठेवू शकतो. ‘ . सदर महाशय पुढील काळात चांगली काळजी घेतील अशी आपण आशा करूयात.