भाजप कार्यकर्त्यांनी शी जिनपिंगऐवजी जाळला चक्क ‘ यांचा ‘ पुतळा : पहा व्हिडीओ

  • by

देशात सध्या लडाखच्या विषयावरून चीनच्या विरोधात वातावरण असून देशात आणि राज्यात ठिकठिकाणी चीनच्या विरोधात निषेध व्यक्त केला जात आहे . एकीकडे भाजपचे कार्यकर्ते चीनचा बहिष्कार करण्याचे आवाहन करत आहेत तर दुसरीकडे दिल्ली-मेरठ रस्त्याच्या कामाचा ठेका भारतीय कंपनी बाजूला सारून चीनच्या कंपनीला देण्यात आला आहे तशीच परिस्थिती कोळसा उद्योगात देखील आहे. कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करून रस्त्यावर आणणे सोपे आहे मात्र अपुरे ज्ञान आणि अतिउत्साह कसा घातक ठरतो याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे .

पश्चिम बंगाल येथील हा व्हिडीओ असून चीनचा निषेध व्यक्त करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर जमले . पश्चिम बंगालच्या आसनसोल येथील भाजपा कार्यकर्त्यांनी चीनचा निषेध करण्यासाठी रॅली आयोजित केली होती. या रॅलीत चीनचे शी जिनपिंग यांचा पुतळा जाळून हा निषेध व्यक्त होणार होता मात्र अपुरे ज्ञान असणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी चक्क चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याऐवजी उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनचा पुतळा जाळल्याचं समोर आहे. तसेच ” चायना मे जो घटना हुआ लडाख में ” असेही हा कार्यकर्ता म्हणतो त्यामुळे लडाख भारतात आहे हे देखील याला माहित नाही .

https://twitter.com/LavanyaBallal/status/1273568716110913537

व्हायरल झालेल्या ह्या व्हिडिओमध्ये हा कार्यकर्ता म्हणतो, , “आम्ही चीनचा विरोध करतोय. लडाखमध्ये जे झालं त्याविरोधात आम्ही निषेध रॅली काढली आहे…चीनचे जे पंतप्रधान आहेत किम जोंग त्यांचा आम्ही पुतळा जाळून निषेध करणार आहोत. लोकांनी चीनचं सामान न वापरता स्वदेशीचा अवलंब करावा, त्याद्वारे चीनला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करु ” . चीनचे पंतप्रधान कोण आहेत, किम जोंग कोण आहेत कसलीच माहिती नसताना ह्या निषेध रॅलीवरून भाजपची सोशल मीडियात खिल्ली उडवली जात आहे .

सरकारी कंपन्यांनी चीनकडून उपकरणे घेऊ नयेत असे केंद्राने निर्देश केले असले तरी मुळात सरकारी कंपन्याच सरकारने गेल्या ६ वर्षात एकतर संपवल्या आहेत किंवा डबघाईला आणल्या आहेत. २०१४ पासून एकही सरकारी कंपनी सुरु न करता २३ कंपन्या संपल्या आहेत . आता डबघाईला आलेल्या कंपन्यांनी स्वस्त मिळणारा चिनी माल देखील घ्यायचा नाही असे एक फर्मान कितपत योग्य आहे याच विचार करायला हवा . त्यापेक्षा सरकारने खाजगी कंपन्याना असे आवाहन करून चीनची आयात पूर्णपणे बंद करावी आणि आपल्या प्रखर देशभक्तीचा परिचय लोकांना करून द्यावा , अशी देखील आता केंद्रावर टीका होत आहे .