नगरमध्ये लॉकडाऊन गरजेचा ? मागील सात दिवसांची आकडेवारी धक्कादायक

  • by

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. गेल्या सात दिवसाचा विचार केला तर तब्बल १०४७० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे तर 46 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. अहमदनगरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत विस्फोट झाला असून उपचारासाठी बेड मिळेनासे झाले आहे.

कोरोनावर उपचारासाठी वापरले जाणारे रेमेडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा सुद्धा जाणवू लागला आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सुरू असूनही प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. दरम्यान पूर्वीप्रमाणे विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर देखील पूर्वीसारखी कारवाई करण्याचे प्रमाणही कमी झालेले असल्याने नागरिकही बेफिकीर झालेले आहेत .

मागील सात दिवसांत 10470 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या सात दिवसांत 46 जणांचा मृत्यू झाला आहे. सरासरी 1500 रुग्णांची भर पडली आहे. आजपर्यंत एकूण रूग्ण संख्या ही 1 लाख पार झाली आहे. तर 9098 वर उपचार सुरू आहे. बरे होण्याचे प्रमाण 89.67% टक्के आहे. बरे झालेले रूग्ण संख्या 89 हजार 701 इतकी आहे. आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात कोरोनामुळे 1238 जणांचा मृत्यू झाला आहे.