अमित शाह यांचा दौरा रद्द..जाणून घ्या छत्तीसगडमध्ये नेमकं काय घडलंय ?

  • by

छत्तीसगडच्या सुकमामध्ये नक्षलवाद्यांनी जवानांना वेढा घालून भीषण हल्ला केला आणि या भ्याड हल्ल्यात २२ जवान शहीद झाले आहेत. देशाला हादरवणाऱ्या या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आपला आसाममधील प्रचार दौरा मध्येच सोडून दिल्लीला परतत आहे. आसाममध्ये शहांची एकच प्रचारसभा झाली. त्यांच्या तिथे आज एकूण तीन प्रचारसभा होणार होत्या.

गृहमंत्री अमित शहा हे दुपारी उशिरा दिल्लीत दाखल होतील. यानंतर छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्याचा आढावा ते घेणार आहेत, अशी माहिती जितेंद्र सिंह यांनी दिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या नक्षलवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. तसंच पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि राजनाथ सिंह यांनी जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा इशारा गंभीर इशारा नक्षलवाद्यांना दिला आहे.

छत्तीसगडमध्ये नेमके काय घडले ?

छत्तीसगड येथील कुख्यात नक्षली हिडमा याला पकडण्यासाठी जवान नक्षलवाद्यांच्या गड जंगल भागात घुसले होते. २००० जवान यात सहभागी होते. जवानांच्या वेळवेगळ्या टीम यात करण्यात आल्या होता. नक्षलवाद्यांनी जवानांना आधी घनदाट जंगलात घुसू दिलं. त्यानंतर त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार सुरु केला . सुरक्षा दलांच्या वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या होत्या. या पैकी एक टीम कुख्यात नक्षलवादी हिडमाच्या याच्या बटालियनच्या घातक हल्ल्यात सापडली. जवान दाट जंगलात अडकले असल्याने डोंगरांवर लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांचावर हल्ला केला.

नक्षलवाद्यांनी वेढल्यामुळे जवानांवर निघण्याचा कुठलाही मार्ग नव्हता तरीही जवानांनी हिडमाच्या बटालियनला जोरदार प्रत्युत्तर दिलं. यात नक्षलवाद्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक नक्षलवादी ठार झाल्याचं सांगण्यात येत आहे. नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरून ४ चार ट्रॅक्टर भरून आपल्या साथीदारांचे मृतदेह नेल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं मात्र यात २२ जवानांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली.

हिडमाच्या सुरक्षेत नक्षलवाद्यांची सर्वात घातक टीम असते. ही टीम अत्याधुनिक हत्यारांनी सज्ज असते. या टीममध्ये जवळपास ८०० नक्षलवादी होते. त्यांनी आमच्यावर डोंगरांवरून हल्ला केला, असं चकमकीतील एका जवानाने सांगितलं. हिडमा हा छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात आश्रय घेत असतो. घटनेचे स्थळ हे तेलंगणला लागून आहे.

हिडमासोबत असलेल्या अनेक नक्षलवाद्यांकडे अनेक अत्याधुनिक हत्यार आहेत. अनेक राज्यांचे पोलिस हिडमाच्या शोधात आहेत. तरीही तो तावडीत येत नाही. त्यांनी जवानांवर रॉकेट लाँचरने हल्ला केला. यूबीजीएल, रॉकेट लाँचर, आणि इन्साससह एके-४७ रायफलींनी नक्षलवाद्यांनी वेढा घालून १०० ते २०० मीटर अंतरावरून गोळीबार करत होते, अशी माहिती जखमी जवानाने दिली. एप्रिल २०१० मध्ये दंतेवाडा इथे झालेल्या हल्ल्यामागे तसेच २०१७ ला सुकमा इथे झालेल्या हल्ल्यामागे याच हिडमाचा हाथ असल्याचा आरोप आहे . त्याच्या शिरावर ४० लाखांचे बक्षिस जाहीर केलेले आहे.