आकाशात ‘ तसला ‘ प्रकार करण्याच्या नादात मारली उडी मात्र पुढे जे घडले ..

  • by

कधी कोणाला कशाची इच्छा होईल काहीही सांगता येत नाही. सध्या एक जोडी त्यांच्या अशाच वेगळ्या इच्छेमुळे चर्चेत आली आहे. संपूर्ण जगभरात त्यांच्या या इच्छेची जोरदार चर्चा रंगली आहे. एका महिलेला आपल्या जोडीदारासोबत थेट हवेत स्काय डायव्हींग करताना सेक्स करण्याची इच्छा झाली. मात्र या इच्छेची मोठी किंमत महिलेच्या जोडीदाराला चुकवावी लागली आहे .

उपलब्ध माहितीनुसार, ब्रिटनमध्ये राहणाऱ्या William आणि Leslie यांनी स्काय डायव्हींग करताना सेक्स करण्याचा प्रयोग करून पाहायचा ठरवले. आधी ही कल्पना Leslie च्या डोक्यात आले आणि तिने ती विल्यमला सांगितली. William ला सुद्धा ही कल्पना चांगली वाटल्यांतर दोघांनीही हवेत भरारी घेताना सेक्स करण्याचे ठरवले आणि त्यांनी त्या दृष्टीने तयारी सुरु केली.

दोघांचे एकमत झाल्यानंतर त्यांनी एका स्काय डायव्हिंग क्लबशी संपर्क साधला. त्यानंतर स्काय डायव्हिंग करण्याआधी या कपलने विमानात बसल्यानंतर एकमेकांना किस करण्यास सुरुवात केली. दोघेही एकमेकांत गुंतल्यानंतर त्यांनी विमानातून उडी घेतली. आणि ठरल्याप्रमाणे हवेतून भरारी घेत असताना त्यांनी सेक्स करण्यास सुरुवात केली.

स्काय डायव्हिंग दरम्यान सेक्स करताना त्यांना भान राहिले नाही. William ची नजर अचानकपणे जेव्हा जमिनीकडे गेली तेव्हा मात्र आपण आता पडणारच हे त्यांच्या लक्षात आले आणि William ने Leslie चे पॅराशूट गडबडीत उघडले. यामुळे Leslie तर बचावली मात्र स्वत:चे पॅराशूट थोड्या उशिराने उघडल्यामुळे William थेट जमिनीवर आदळला. एवढ्या उंचावरुन अगदीच जोरात जमिनीवर आपटल्याने William ला जबर मार लागला. या घटनेत त्याचे नाक तुटले.

जमिनीवर पोहचताच Leslie ने William कडे धाव घेतली आणि त्याला रुग्णालयात दाखल केलं. या अपघाताविषयी बोलताना जमिनीवर जोरात आदळल्यामुळे William च्या शरीरात अंतर्गत अनेक ठिकाणी मार लागला आहे. तसेच, William चे नाकसुद्धा तुटले आहे, असे डॉक्टरांनी सांगितलं आहे. हा अपघात झाल्यामुळे आगामी काळात William ला काळजी घ्यावी लागणार आहे.