.. अन तरुण आपल्या चुलत मावशीला घेऊन झाला फरार ,अखेर पोलिसांकडून तोडगा

  • by

झारखंडच्या चतरा जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. चतरा जिल्ह्यातील रक्सी गावाच्या एका तरुणाने चक्क आपल्या चुलत मावशीसोबतच लग्न केल्याचं समोर आलं. तरुण आणि त्याची चुलत मावशी यांचं एकमेकांवर प्रेम जमलं मात्र विरोध होत असल्याने त्यांनी दोघांनी नातेवाईक, समाज आणि ग्रामस्थांच्या विरोधात जाऊन शिव मंदिरात जाऊन लग्न केलं .

संबंधित तरुण त्याच्या चुलत मावशीसोबत शिव मंदिरात लग्न करत असल्याची माहिती गावातील काही लोकांना समजली. त्यानंतर हे वृत्त संपूर्ण गावात पसरलं. तरुणाच्या कुटुंबियांना देखील याबाबत माहिती मिळाली. सर्व ग्रामस्थ आणि त्याचे कुटुंबीय शिव मंदिरावर धावून आले. त्यांच्या सर्वांचा रागाचा पारा चढलेला होता. त्यामुळे भेदरलेला तरुण आपल्या पत्नीसोबत तेथून पळून गेला.

तरुण आपल्या एका मित्राच्या घरी त्याच्या पत्नीला घेऊन गेला. तो रात्रभर तिथे थांबला. त्यानंतर दोघांनी पोलिसांकडे जाऊन आपले म्हणणं सांगितलं. पोलिसांनी दोघांची बाजू ऐकूण घेतली. दोघांचं वय हे 21 वर्षांपेक्षा जास्त असल्याने त्यांना त्यांच्या लग्नाबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना बोलावलं.

नवरदेव आणि नवरीच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला स्वीकार करण्यास नकार दिला. पोलिसांनी त्यांची समजूत घालण्याचा भरपूर प्रयत्न केला. तरीही नातेवाईक आणि ग्रामस्थ यांच्याकडून विरोध सुरुच होता. दुसरीकडे प्रेमी युगुलही एकमेकांशिवाय राहू शकत नाही, एकत्रच राहणार, अशा हट्टावर अडून होते . नाही हो नाहो हो करता अखेर पोलीस त्यांच्या घरच्यांना पटवून देण्यात यशस्वी झाले.

पोलिसांनी प्रेमी युगुलाला लग्न करण्याचा अधिकार असल्याचं सांगत कसंतरी त्यांच्या नातेवाईकांना गृहित धरुन लग्न लाऊन दिलं. त्यानंतर त्यांनी प्रेमी युगुलाला आपल्या नातेवाईकांसोबत घरी पाठवलं. मात्र, घरी गेल्यावर प्रचंड गदारोळ झाला. प्रेमी युगुलाच्या कुटुबियांनी त्यांचा स्वीकार करण्यास विरोध केला. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मात्रकाही ग्रामस्थांनी प्रेमी युगुलाच्या आई-वडिलांची समजूत काढली. त्यामुळे हे प्रकरण निवळलं.