जमल बुवा एकदाच..अडीच फूच उंचीच्या अजीमला मिळाली नवरी, वाचा काय करते मुलगी

  • by

उत्तर प्रदेशातील शामलीचा राहणारा अडीच फूट उंची असलेला तरूण अजीम मंसूरीने काही दिवसांपूर्वी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्यासाठी नवरी शोधण्याची मागणी केली होती. सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यानंतर त्याच्याकडे अनेक मुलींची लाइन लागली होती.

आता अजीम मंसूरीने उत्तर प्रदेशच्या हापुडमध्ये राहणाऱ्या एका मुलीला आपली जीवनसाथी बनवण्याचा निर्णय घेतलाय. या मुलीची उंचीही त्याच्या इतकीच आहे. अजीमच्या होणाऱ्या नवरीचा फोटो पहिल्यांदाच समोर आला आहे.

नुकताच हापुडच्या बुशरासोबत अजीम मंसूरीचा साखरपुडा झाला. २० वर्षीय बुशरा बी.कॉम फर्स्ट इअऱला शिकत आहे आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघेही लग्न करतील. कमी उंचीमुळे अजीम मंसूरीचं लग्न जुळण्यास अडचण येत होती. तो अनेक वर्षांपासून लग्नाचं स्वप्न बघत होता. काही दिवसांपूर्वी तो सोशल मीडियात व्हायरल झाला आणि त्याच्यासाठी अनेक मुलींचं स्थळ आलं होतं.

हापुडमधील मजीदपुरा येथील सभासद हाजी अय्यूब यांनी अजीमचा व्हिडीओ पाहिला. हाजी अयूबब आणि अजीमचे नातेवाईक शाहिद मंसूरी एकत्र बिझनेस करतात. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, त्यांच्या भागात राहणारी बुशराही अजीमच्या उंचीची आहे. त्यांची बोलणी सुरू झाली.

अजीमच्या वडिलांसोबत बोलणी करण्यासाठी अजीमला बघण्यासाठी बुशराच्या घरातील लोक शामलीला आले होते. त्यांना अजीम मंसूरी आवडला. त्यानंतर अजीमच्या घरचे लोक बुशराला बघण्यासाठी गेले होते. तिथे दोन्ही परिवारात सोयरीक ठरली. साखरपुडाही झाला. आता बुशरा बी.कॉसचं शिक्षण पूर्ण केल्यावर लग्न करेल. 

बुशराची मोठी बहीण जोया म्हणाली की, अजीम आणि बुशराचं लग्न ठरल्याने ते सगळे फार आनंदी आहेत. बुशरा फार नशीबवान आहे की, तिला अजीमसारखा जोडीदार मिळाला. बुशराही आनंदी आहे. माझ्यासाठीही मुलगा शोधला जात आहे. दोघींचं एकत्रच लग्न केलं जाईल.