नगरमध्ये दुकाने आणि बाजारपेठा बंद, जाणून घ्या काय सुरु काय बंद ?

  • by

राज्य शासनाने रविवारी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सोमवारी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी राज्य सरकारच्या नियमावलीचे पालन करण्याचा आदेश काढलेला आहे. दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू राहणार आहे. सोमवार ते शुक्रवार या पाचही दिवशी सर्व दुकाने मॉल्स आणि मार्केट बंद राहणार आहे. शनिवार आणि रविवार संपूर्ण लॉकडाऊन असेल. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद राहणार आहे. सदर आदेश हा 30 एप्रिल पर्यंत लागू राहणार आहे.

सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत एकत्र येण्यास बंदी राहणार आहे . सोमवार ते शुक्रवार रात्री आठ ते सकाळी सात तसेच शुक्रवारी रात्री आठ ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी देखील राहणार आहे

अत्यावश्यक सेवा मात्र सुरू

रुग्णालये, रोगनिदान केंद्रे,क्लिनिक ,वैद्यकीय विमा कार्यालय ,औषधालय ,औषध कंपन्या तसेच अन्य आरोग्यविषयक वैद्यकीय सेवा, किराणा मालाची दुकाने ,भाजीपाला , दुकाने, दुग्धालय, बेकरी, कन्फेक्शनरी, अन्नपदार्थ, विक्री, दुकाने, सार्वजनिक वाहतूक, ट्रेन टॅक्सी ऑटो, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, स्वराज्य संस्थांकडून देण्यात येणार्‍या सर्व सार्वजनिक सेवा, सर्व प्रकारची मालवाहतूक, कृषीविषयक सर्व सेवा, ई-कॉमर्स प्रसारमाध्यमांच्या संस्था, आपत्ती व्यवस्थापनाने घोषित केलेल्या आवश्यक सेवा याशिवाय एमआयडीसीमधील कारखाने सर्व नियमांचे पालन करून सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे

दिवसभर काय सुरू राहील

  • सहकारी सार्वजनिक खाजगी बँका
  • वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या टेलिकॉम पुरवठादार
  • विमा व मेडिकल कंपनी
  • औषध वितरणाची कार्यालय तसेच कंपनी
  • सर्व सरकारी कार्यालय 50% क्षमतेने
  • सर्व कारखाने उत्पादन युनिट
  • उद्याने व क्रीडांगणे

पूर्णपणे काय बंद राहणार

  • दुकाने मार्केट वॉल्स मार्केट व मॉल अत्यावश्यक सेवा वगळून
  • सिनेमा नाट्यगृहे सभाग्रह करमणूक केंद्र वॉटर पार्क क्लब जलतरण तलाव व्हिडिओ गेम वॉटर पार्क रेस्टॉरंट बार
  • धार्मिक स्थळे उपासना स्थळी केश कर्तनालय ब्युटी पार्लर सलून शाळा महाविद्यालय खाजगी कोचिंग क्लासेस
  • धार्मिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक कार्यक्रम
  • रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थांच्या विक्रीच्या ठिकाणी खाण्यास बंदी दररोज सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत पार्सल डिलीव्हरी देण्यास मुभा असेल
  • हॉटेलच्या आवारात असलेले रेस्टॉरंट बार वगळता इतर सर्व रेस्टॉरंट बार बंद राहतील
  • सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत पार्सल तसेच होम डिलिव्हरी सुरु राहील
  • या कालावधीत खाद्यपदार्थाची ऑर्डर देण्यासाठी रेस्टॉरन्ट किंवा बारला भेट देता येणार नाही
  • रस्त्याकडे खाद्यपदार्थाचे स्टॉल सुरू राहतील मात्र खाद्यपदार्थ त्याच ठिकाणी खाण्यास मनाई राहील

नगरमध्ये महापालिका आणि आरोग्य विभागाच्या वतीने ठिकठिकाणी लसीकरण व स्वाब टेस्ट साठी केंद्रे सुरु करण्यात आलेली आहे . स्वाब टेस्टसाठी आधार कार्डची प्रत देणे आवश्यक आहे .नगरमधील सावेडी परिसरात देखील सावेडी तहसील कार्यालयासमोर लसीकरण व स्वाब टेस्ट साठी केंद्र सुरु करण्यात आलेले असून नागरिकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळतो आहे, मात्र इथे देखील गर्दीमुळे सोशल डिस्टंशिंगचे पालन योग्य पद्धतीने होताना दिसत नाही.