रेखा जरे हत्याकांड : ‘ त्यांची ‘ पोलीस स्टेशनला हजेरी तर रुणाल जरे यांनी केली ‘ ही ‘ मागणी

  • by

रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे त्याच्या संपर्कात असलेल्या पाच जणांची सोमवारी पोलिसांनी कसून चौकशी केली यावेळी सर्वांचे जबाब नोंदवून घेण्यात आले या चौकशीमध्ये अनेक महत्वपूर्ण माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचे वृत्त आहे.

रेखा जरे यांच्या हत्याकांड घडवून आणल्यानंतर बोठे शहरातून पसार झाला होता. घटनेच्या तीन महिन्यानंतर पोलिसांनी त्याला हैदराबाद येथून अटक केली होती. फरार असताना त्याने काही जणांना संपर्क केला होता, तसेच घटनेपूर्वी देखील तो काही लोकांच्या सतत संपर्कात राहत होता. पोलीस तपासात ही बाब समोर आल्यानंतर त्या पाच जणांना आठ जणांना पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस पाठवली होती त्यापैकी सोमवारी पाच जणांची चौकशी पूर्ण झाली तर उरलेल्या तीन जणांची चौकशी येत्या दोन दिवसात होणार आहे.

रेखा जरे हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले असून येत्या काही दिवसात बोठे याच्या विरोधात पुरवणी दोषारोप पत्र दाखल केले जाणार आहे. त्याच अनुषंगाने पोलीस सध्या भक्कम पुराव्यांचा शोध घेत असून बोठे याने हत्येपूर्वी तसेच हत्येनंतर कुणाला संपर्क केला याची माहिती पोलिसांनी काढली असून त्या अनुषंगाने बहुतांश जणांची जबाब नोंदवून घेण्यात आलेले आहेत.

रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे व त्याचे वकील सचिन पटेकर यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. बोठे याला अटक केल्यानंतर जरे यांचे संरक्षण कमी करण्यात आले असून त्यांच्या वकीलांचे देखील संरक्षण काढण्यात आलेले आहे. बोठे याच्या पासून जीविताला धोका असून पोलीस संरक्षण पूर्ववत करावे अशी मागणी जरे व त्यांचे वकील पटेकर यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आलेली आहे. या मागणीबाबत गृहमंत्र्यांना देखील कळविण्यात आले असल्याचे पटेकर यांनी सांगितले.

नगर पोलिसांनी अशी केली होती कारवाई ?

नगर येथील सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे (रा. बालिकाश्रम रोड सावेडी, नगर) हा हैद्राबादमधील बिलालनगर या गुन्हेगारांना आश्रय देण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या भागात लपून बसला होता. गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्या तेथील एका वकिलानेच त्याला यासाठी मदत केली होती. शेवटी नगरच्या पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याच्यासह मदत करणाऱ्या आरोपींनाही अटक केली होती. आधुनिक तंत्रज्ञानाची चांगलीच माहिती असल्याने तो पोलिसांना गुंगारा देत होता.

३० नोव्हेंबरला रेखा जरे यांची हत्या झाली होती. गुन्ह्यात नाव आल्यापासून बोठे फरार झाला. काही दिवस इतत्र राहिल्यानंतर याने हैदराबाद गाठले. पूर्वी त्याने याच भागातील उस्मानिया विद्यापाठातून पीचएडी मिळविलेली आहे. त्यावेळी तेथील जर्नादन अकुला चंद्राप्पा (रा. सारोमानगर, रंगारेड्डी, हैद्राबाद, तेलंगाना) या वकीलाशी त्याची ओळख झाली होती. गुन्हेगारांना मदत करण्यासाठी हा वकील परिसरात फेमस आहे.

बाळ बोठे याने मदत हवी म्हणून वकिलांकडे याचना केली. पोलिसांना पक्की खबर मिळाली तेव्हा पोलिस याच भागातील प्रतिभानगर परिसरातील एका हॉटेलवर गेले. त्यातील रूम नंबर १०९ मध्ये बोठे लपून बसल्याची माहिती पोलिसांना होती. मात्र, रुमला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. पोलिसांना चकवा देण्यासाठी बोठे याने तेथे बी. बी. पाटील या नावाने बुकिंग केलेले होते. ओळख लपविण्यासाठी तो दाढी वाढवून आणि वेष बदलून वावरत होता. मात्र, तो तेथेच असल्याची माहिती पक्की असल्याने पोलिसांनी रुमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि बोठे पकडला गेला.

बाळ बोठे याला पकडले त्यावेळी तो रूममध्ये एकटाच होता. त्याला मदत करणारा चंद्राप्पा, राजशेखर अंजय चाकाली (वय २५ रा. गुडुर करीम नगर, मुस्ताबाद, आंध्र प्रदेश), शेख इस्माईल शेख अली (वय ३० रा. बालापुर, सरुरनगर, रंगारेड्डी, आंध्रप्रदेश), अब्दुल रहमान अब्दुल आरीफ (वय ५२, रा. चारमीनार मस्जीद, रंगारेड्डी, आंध्रप्रदेश) यांनाही अटक करण्यात आली, तर पी अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी (रा. हैद्राबाद) ही महिला फरार आहे.

बोठे याच्या खोलीतून काही मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. फरार असल्याच्या काळात त्याने अनेक मोबाईल वापरले. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी महाराष्ट्रासह पंजाब, छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यांत सुमारे शंभरहून अधिक ठिकाणी शोध मोहीम राबविली. हैदराबादमध्ये तीन दिवसांपासून कारवाई सुरू होती. तेथेही तीन ठिकाणांहून पोलिस पोहचण्यापूर्वी पळून जाण्यात तो यशस्वी झाला होता. आपली ओळख लपविण्यासाठी त्याने दाढी वाढविली होती . वेषांतर केले होते तसेच तो बी. बी. पाटील या नावाने वावरत होता.

आरोपी सागर भिंगारदिवे याच्यामार्फत बाळ बोठे याने जरे यांच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यानंतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारेही जरे यांच्या हत्येचा बोठे हाच सुत्रधार असल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हापासून पोलिस त्याचा शोध घेत होते . मधल्या काळात त्याने अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयातही तो फेटाळण्यात आला. मधल्या काळात पोलिसांनी त्याला फरार घोषित केले. पारनेर येथील न्यायालयाने त्याला फरार घोषित करून ९ एप्रिलपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता. त्याआधीच त्याला अटक झाली.

पोलिसांची पाच पथके बाळ बोठे याचा शोध घेत होती. पोलिसांनी रेखा जरे यांच्या घराची,तसेच या प्रकरणातील आरोपी सागर भिंगारदिवे व बोठे याच्या घराची झाडाझडती घेतली होती आणि काही माहिती पोलिसांच्या हाती लागलेली होती . नगरसह अन्य ठिकाणी आतापर्यंत दहापेक्षा जास्त ठिकाणी पोलिसांना शोध घेतला होता . विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या झडतीमध्ये महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले होते .

बाळ बोठे याने काही दिवसापूर्वी नगर इथे हनी ट्रॅपचे रॅकेट कसे कार्यरत आहे याबदल एक मालिका छापली होती. त्या मालिकेत कसे धनदांडगे सावज हेरून जाळ्यात ओढले जाते आणि नंतर माहितीतील पोलिसांची मदत घेत धाड घालून कशा पद्धतीने ‘ मांडवली ‘ केली जाते याचा लेखाजोखा देखील दिला होता, अर्थात ही माहिती बोठे यांच्यापर्यंत कशी पोहचत होती हे मात्र गूढ आता बोठे ताब्यात आल्याने उकलण्यात येईल का ? याचे उत्तर नगरकरांना आता हवे आहे .