नगर हादरले..एमआयडीसीमध्ये महिलेची गळा आवळून हत्या, आरोपी अटकेत

  • by

अहमदनगर एमआयडीसी येथील एका कामगाराने पत्नीचा गळा आवळून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना 3 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

लता संतोष पाटोरकर असे खून झालेल्या महिलेचे नाव असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात भागिनाथ सूर्यभान कराळे यांनी चार एप्रिल रोजी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संतोष परसराम पाटोरकर ( वय 28 राहणार तालुका धारणी जिल्हा अमरावती ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष पाटोरकर हा काही दिवसांपूर्वी एमआयडीसी इथे पत्नीसमवेत कामाला आला होता.

कॉन्ट्रॅक्टर कराळे यांच्याकडे तो कामाला होता. 3 एप्रिल रोजी रात्री आरोपीने नगर एमआयडीसी येथील एका कंपनीच्या सिक्युरिटी केबिनमध्ये त्याची पत्नी लता तिचा गळा आवळून खून केला याप्रकरणी आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे पुढील तपास करत आहेत