‘ युजलेस जावडेकर , गुजरातची हुजरेगिरी करणारे जावडेकर हे महाराष्ट्रद्रोहीच ‘, कोणी साधला निशाणा ?

शेअर करा

राज्यात केवळ दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा उपलब्ध आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारला लस पुरवण्याची कळकळीची विनंती केली. तसेच गुजरात छोटं राज्य असूनही महाराष्ट्रापेक्षा गुजरातला अधिक लसींचा पुरवठा करण्यात आल्याचा आरोप टोपे यांनी केला. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने लसीकरणाचं योग्य नियोजन केलं नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे लसीच्या साठ्यावरून राजकारण पेटले आहे . केंद्राकडून याआधी देखील महाराष्ट्राबाबत दुजाभाव करण्यात आलेला आहे .

गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या महाराष्ट्रापेक्षा निम्मी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र गुजरातच्या दुप्पट आहे. तरीही केंद्र सरकारने गुजरातला आतापर्यंत 1 कोटी लसींचा साठा दिला आहे. तर महाराष्ट्राच्या वाट्याला अवघ्या 1 कोटी 14 लाख लसी आल्या आहेत, असे सांगत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारच्या लस वाटप धोरणाविषयी नाराजी व्यक्त केली होती.

राजेश टोपे यांनी केंद्र सरकारच्या लस वाटप धोरणातील त्रुटींवर बोट ठेवले. आम्हाला केंद्र सरकारशी भांडायचे नाही. केंद्र सरकार महाराष्ट्राला सहकार्यही करत आहे. मात्र, केंद्र सरकारने महाराष्ट्राला प्रत्येक आठवड्याला असणारी 40 लाख लसींची गरज लक्षात घेतली पाहिजे. सध्या महाराष्ट्राकडे जवळपास 9 लाख लसी आहेत. हा साठा दीड दिवस पुरेल. केंद्र सरकारने नव्याने 17 लाख लसी दिल्या असल्या तरी आठवड्याला 40 लाख या मागणीच्या तुलनेत हा साठा अपुरा आहे, असे त्यांनी सांगितलं.

महाविकासआघाडी सरकारच्या आग्रही मागणीनंतर केंद्र सरकारने गुरुवारी महाराष्ट्रासह अन्य राज्यांना कोरोना लसींचे वाटप केले. यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला अवघ्या 7,40,000 लशी आल्या आहे. तर लस वाटपात केंद्राने भाजपशासित राज्यांना झुकते माप दिल्याची चर्चा आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात दिवसाकाठी 4 लाख लोकांना लस दिली जात आहे. केंद्र सरकारकडून वेगाने पुरवठा झाला तर ही संख्या आठ लाखापर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा निर्धार आहे मात्र केंद्राकडून अपुरा होत असलेला पुरवठा हेच लसीकरनाचा वेग मंदावण्याचे मुख्य कारण आहे .

मागच्या लॉकडाऊन मध्ये वाटाण्याच्या शेंगा सोलत बसणारे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारच्या बेजबाबदारपणामुळे केंद्राच्या कोरोना विरुद्धच्या लढ्याला सुरुंग लागल्याचा आरोप केला आहे तर तसेच महाराष्ट्र सरकार राजकारण करत असून केंद्र सरकारवर निराधार आरोप करत असल्याचाही दावा हर्षवर्धन यांनी केला आहे . महाराष्ट्र सरकारने मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना लस पुरवठ्यातील तुटवड्यावरुन केंद्रावर हल्ला चढवला होता त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी हे आरोप केले आहेत तर केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी देखील अशाच स्वरूपाचे आरोप महाराष्ट्र सरकारवर केले होते त्याचा महाराष्ट्र काँग्रेसने चांगलाच समाचार घेतला आहे .

महाराष्ट्र काँग्रेसने एक ट्विट केले असून त्यात, केंद्रीय मंत्री ‘युजलेस’ जावडेकर वॅक्सिन वेस्टेज रेटबद्दल खोटी माहिती देऊन महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. महाराष्ट्राचा वॅक्सिन वेस्टेज रेट राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षा कमी म्हणजे ३% आहे. गुजरातची हुजरेगिरी करून मातृभूमीची बदनामी करणारे जावडेकर हे महाराष्ट्रद्रोहीच! ‘ असे म्हटले आहे आणि प्रकाश जावडेकर यांनाही त्यात टॅग करून सुनावले आहे .

भारतानं परदेशात 6 कोटी डोस दिले आहेत. म्हणजेच एकूण लसीकरणाच्या जवळपास 70 टक्के डोस निर्यात झाले आहेत. इथे देखील केंद्राने देशातील नागरिकांना प्राथमिकता न देता व्यापारावर लक्ष दिलेले आहे . एकूण 65 देशांना भारतानं लसी दिल्यात. निर्यात केलेल्या देशांचा विचार केला तर 10 मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार बांगलादेशला 90 लाख, म्यानमारला 37 लाख डोस, नेपाळला 23.48 लाख डोस, भूटानला 1.5 लाख डोस, मॉरिशसला 2 लाख डोस तर श्रीलंकेला 12.64 लाख डोस देण्यात आले आहेत. तर पाकिस्तानला करारानुसार 4 कोटी 50 लाख डोस मिळणार आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी लसींचा साठा संपल्यानं लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आलीय. राज्यात सातारा, सांगली, कोल्हापूर, पनवेलसह अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहे. तर पुणे, मुंबई, नागपूर आणि सोलापूर जिल्ह्यात दोन दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक राहिलाय. पुण्यातही काल काही भागातील लसीकरण केंद्रांवरुन लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना परतावं लागल्याचा प्रकार घडला.


शेअर करा