तीन महिन्यापासून बायको माहेराहून येईना म्हणून त्याने घेतली ‘ मोठी ‘ रिस्क.. पुढे काय घडले ?

शेअर करा

चित्र: प्रतिकात्मक

गेल्या काही दिवसात पुण्यात आत्महत्येचे प्रमाण जास्त वाढले आहे. सुखसागर नगर येथील सहकुटुंब झालेली आत्महत्या तसेच धायरी येथील मंडप व्यावसायिकाची आत्महत्या असे प्रकार सुन्न करणारे आहेत अशातच आणखी एक आत्महत्या होणार होती मात्र पोलिसांनी अत्यंत सतकर्ता दाखवून ह्या व्यक्तीचे समुपदेशन केले आणि वाकड इथे होणारी एक आत्महत्या वाचवण्यात पोलिसांना यश आले.

पुण्यातील वाकड परिसरातील घटना असून एका व्यक्तीने नियंत्रण कक्षात फोन केला. आवाजावरूनच तो अत्यंत खचलेला दिसत होता , फोनवर तो म्हणाला,” गेल्या तीन महिन्यांपासून माहेरी गेलेली पत्नी आणि मुले घरी परत येत नाहीत . मी एकटा पडलो असून आयुष्य संपवत आहे ” . त्याच्या ह्या फोनवरून नियंत्रण कक्षाला पुढे काय घडणार याचा अंदाज आला आणि पोलिसांनी वेळ न दवडता त्याच्या घरी धाव घेतली आणि त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यांपासून या व्यक्तीची पत्नी माहेरी आहे. तिच्यासोबत मुलेदेखील आहेत. मात्र, पत्नी आणि मुले घरी येत नाहीत. त्यामुळे नैराश्य येऊन आपण आत्महत्या करत असल्याचे या व्यक्तीने फोनवर सांगितले होते. नियंत्रण कक्षातून वाकड पोलिसांना तातडीने माहिती देण्यात आली. पोलिसांनीही तात्काळ या व्यक्तीच्या घरी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांची समजूत काढली आणि त्याला आत्महत्या करण्यापासून रोखलं. सध्या ह्या व्यक्तीला त्याच्या भावाच्या स्वाधीन केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

देशात एकीकडे कोरोनाने थैमान घातले असून दुसरीकडे कोणत्याही प्लॅनशिवाय लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत . सध्या लोकांची आर्थिक स्थिती ही प्रचंड खालावलेली असून गेलेले रोजगार, वाढती महागाई यातून बाहेर पडण्याचे मार्ग सापडत नाही. गेल्या काही दिवसात राज्यात आणि देशात आत्महत्या करण्याच्या प्रमाणात देखील मोठी वाढ झालेली असून शुल्लक कारणावरून सुद्धा लोक टोकाची भूमिका घेत आहेत.


शेअर करा