निवडणूक काळातच कोलकात्यात कोरोना स्फोट, प्रत्येक दुसरा व्यक्ती आढळतोय कोरोना पॉझिटिव्ह

शेअर करा

कोलकाता – कोरोना व्हायरस महामारीमुळे देशातील परिस्थिती अत्यंत बिघडली आहे. अनेक राज्यांतील आरोग्य सेवाही मोडकळीस येऊ लागल्या आहेत. कुठे रुग्णांना बेडच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. तर कुठे ऑक्सिजनचा. यातच आता पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक सुरू आहे. या निवडणूक काळातच आता पश्चिम बंगालमध्येही कोरोना संक्रमितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यातच राजधानी कोलकात्याचे हाल तर अणखीनच बिघडले आहेत. येथे कोरोनाची आरटी-पीसीआर टेस्ट करणाऱ्या दोन जणांपैकी एक जण पॉझिटिव्ह येत असल्याचे चित्र आहे. तसेच राज्याचा विचार करता चार पैकी एकाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येत आहे.

गेल्या महिन्याच्या संख्येचा विचार करता ही संख्या पाच पट अधिक आहे. गेल्या एक महिन्यापूर्वी येथे टेस्ट केलेल्या 20 जणांपैकी केवळ एकचाच रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह येत होता.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आरटी-पीसीआर टेस्ट करणाऱ्या लॅबच्या एका डॉक्टरांचे म्हणणे आहे, की ”कोलकाता आणि त्याच्या जवळपासच्या कोरोना टेस्ट करणाऱ्या लॅबच्या टेस्टमध्ये 45-55 टक्के पॉझिटिव्हिटी रेट मिळत आहे. तसेच राज्याच्या इतर शहरांत हा स्तर 24 टक्क्यांच्या जवळपास आहे. हे प्रमाण पाच महिन्यांपूर्वी केवळ पाच टक्केच होते.” तसेच, एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्षात पॉझिटिव्हिटी रेट याहूनही अधिक आहे. अनेक लोक असे आहेत, त्यांना अगदी हलक्या स्वरुपाचे तसेच अनेकांना तर लक्षनेही नाहीत, असेही रुग्ण आहेत. मात्र, त्यांनी अद्याप तपासणी केलेली नाही. आपण तपासणी वाढविण्याची आवश्यकता आहे.

एक एप्रिलला बंगालमध्ये 25,766 जणांची कोरोना टेस्ट झाली होती. यात केवळ 1274 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. हा पॉझिटिव्ह रेट 4.9 टक्के होता. शनिवारी 55,060 लोकांची तपासणी करतण्यात आली, यांपैकी तब्बल 14,281 जण पॉजिटिव्ह असल्याचे दिसून आले. हा दर 25.9 टक्के होता. पियरलेस हॉस्पिटलचे मायक्रोबायोलॉजिस्ट भास्कर नारायण चौधरी यांनी सांगितल्यानुसार, लोकांमध्ये वेगाने संक्रमण होण्यामागे म्यूटेंट व्हायरस आहे. जो, अत्यंत कमी वेळातच अधिकांश लोकांना संक्रमित करत आहे. तसेच या मागचे एक कारण असेही आहे, की ज्यांना लक्षणे दिसत आहेत, त्यांपैकी काही लोकच कोरोना टेस्ट करण्यासाठी जात आहेत. 

पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. निवडमूक आयोग येथे एकूण आठ टप्प्यांत निवडणूक घेत आहे. त्याचा सातवा टप्पा उद्या म्हणजेच सोमवारी होणार आहे. तत्पूर्वी मतदानाचे अर्धे टप्पे होईपर्यंत येथे सर्वच पक्ष जोरदार रोडशो आणि रॅल्या करत होते. त्यात मोठ्या प्रमाणावर गर्दीही जमत होती. मात्र, कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेत गेल्या गुरुवारी निवडणूक आयोगाने निवडणूक प्रचारावर काही बंधने घातली आहेत.


शेअर करा