आहे तुझी औकात..? नर्स भडकली, डॉक्टराच्या कानशिलात लगावली : पहा व्हिडीओ

  • by

देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गेल्या पाच दिवसांपासून दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. अनेक राज्यांमधील रुग्णालयांची क्षमता संपली असल्यानं आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचं चित्र आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णाचे नातेवाईक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये वाद होत असल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. तर उत्तर प्रदेशातल्या रामपूरमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्येच मारामारी झाली असून नर्स आणि डॉक्टर यांच्यातील वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रामपूर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांच्यात वाद झाला. त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. नर्सनं डॉक्टरांच्या कानशिलात लगावली. डॉक्टरांनी देखील नर्सला मारहाण केली. यामुळे बराच गोंधळ झाला. पोलीस आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दोघांची समजूत काढून त्यांना शांत केलं. सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास हा प्रकार घडला असून वैद्यकीय कर्मचारी देखील प्रचंड दबावात असून त्यातूनच चिडचिड होणे, शुल्लक कारणावरून वाद होणे असे प्रकार घडत आहेत.

रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला मृत्यूचं प्रमाणपत्र देण्यास सांगितलं. त्यासाठी नर्स डॉक्टरांकडे गेली. तर डॉक्टरांनी तिला ही बाब लिखित स्वरुपात आणायला सांगितली. नातेवाईक नर्सकडे गेल्यावर ती संतापली. तिनं आपत्कालीन विभागात धाव घेतली. यानंतर तिचा डॉक्टरांसोबत वाद झाला. दोघांनी एकमेकांनी शिवीगाळ केली आणि त्यातूनच हा प्रकार घडला.

तुझी औकात आहे का, असं म्हणत नर्सनं डॉक्टरांच्या श्रीमुखात भडकावली. यानंतर डॉक्टरांनीदेखील हात उचलला. त्यामुळे आपत्कालीन विभागात गोंधळ झाला. तिथे कर्मचारी मोठ्या संख्येनं कर्मचारी उपस्थित होते. मृत रुग्णाचे नातेवाईकदेखील तिथेच होते. यापैकी कोणीतरी संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला. त्यानंतर तो व्हायरल झाला. मारहाणीची माहिती रुग्णालयातील पोलीस चौकीला मिळाली. त्यानंतर त्यांनी हे प्रकरण शांत केलं. या प्रकरणी कोणीही पोलिसांकडे तक्रार नोंदवलेली नाही.