लॉकडाऊन नावालाच ? लॉजमध्ये एक युवती आणि एक ग्राहक आक्षेपार्ह अवस्थेत सापडले

  • by

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकानं बंद ठेवण्यात आली आहे. पण, असं असतानाही बुलडाण्यात लपूनछपून अवैध धंदे सुरूच असल्याचे समोर आले असून शेगाव इथं एका लॉजवर पोलिसांनी कारवाई करून एका मुलीला अटक केली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील आनंद सागरजवळील अंबर लॉजवर देहविक्रीसाठी आलेल्या कोलकात्याच्या एका युवतीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सोमवारी रात्री झालेल्या कारवाईत अटक करण्यात आली आहे. या युवतीसोबतच एक ग्राहक व लॉज मॅनेजरला सुद्धा अटक करण्यात आली आहे. अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत यांच्या आदेशाने शेगाव पोलिसांनी ही कारवाई केली आहे .

नागपूर येथील एका एजंटकडून या युवतीला शेगाव येथे पाठवण्यात आले असल्याचं सांगण्यात येते आहे. गेल्या 5 दिवसांपासून ही तरुणी याच लॉजवर राहत होत. हा गोरखधंदा सुरू असल्याची कुणकुण पोलिसांना खबऱ्याच्या मार्फत मिळाली होती. त्यानंतर अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत यांनी कारवाईचे आदेश दिले. सोमवारी रात्री पोलिसांनी या लॉजवर छापा टाकला असता तरुणी आणि एक ग्राहक आक्षेपार्ह परिस्थितीत आढळून आले. पोलिसांनी या तरुणीला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.