दोन पेगवाल्या डॉली आंटीचा केजरीवालांना पुन्हा ‘ मोलाचा ‘ सल्ला

  • by

लॉकडाऊनची घोषणा होताच दारुचा स्टॉक करून ठेवण्यासाठी दारुच्या दुकानात आलेल्या दिल्लीतील डॉली आंटीने पुन्हा एकदा सरकारला दारुचे गुत्ते उघडण्याचं आवाहन केलं आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालजी, गुत्ते उघडा. मग पाहा दारू आत आणि कोरोना बाहेर जाईल, त्यामुळे तुमची डोकेदुखीही कमी होईल, असं या आंटीने म्हटलं आहे. या आंटीचा नवीन व्हिडीओही व्हायरल झाला आहे. याआधी देखील याच आंटीचा एका व्हिडीओ व्हायरल झाला होता त्यात त्यांनी ‘ रोज दारू पीत असल्यामुळे कोरोना मला होणार नाही ‘ असा दावा केला होता.

दिल्लीच्या शिवपुरी येथे डॉली आंटी राहते. या व्हिडीओतून ती केजरावाल सरकारला दारुचे गुत्ते उघडण्याची विनंती करत आहे. रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजन कमी पडत आहेत. त्याचं कारण दारुचे गुत्ते आहेत. दोन पेग लावल्यावर कोरोना मरून जाईल. पेग आत जाईल आणि कोरोना बाहेर येईल, असंही डॉली आंटी म्हणताना दिसत आहे.

दारुचे गुत्ते उघडल्यास रुग्णालयातील बेड रिकामे होतील, असा दावाही त्यांनी केला आहे. गुत्ते उघडल्यावर बेड खाली होतील. केजरीवाल सरकारला त्यामुळे अडचणी येणार नाहीत. ऑक्सिनज सिलिंडरची समस्याही दूर होईल. लोक पिणारे आहेत. त्यांच्या पोटात दारू जाऊ द्या. कोरोना बरा होईल. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मी रोज पेग घेत आहे. परंतु आता स्टॉक संपला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

दिल्लीत कोरोनाचा स्फोट झाला आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने अखेर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नाईलाजाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. 19 एप्रिलच्या रात्रीपासून हा लॉकडाऊन सुरू झाला आहे. सात दिवस लॉकडाऊन असेल. यावेळी सर्व काही बंद राहणार आहे. त्यामुळे दिल्लीत तळीराम हवालदिल झाले असून त्यांनी दारुचा स्टॉक करण्यासाठी दारुच्या दुकानांबाहेर तोबा गर्दी केली होती.

लॉकडाऊनच्या आधीच तळीराम दारूच्या दुकानात गेले होते. दिल्लीतील शिवपुरी येथील गीता कॉलनीच्या एका दारुच्या दुकानात डॉली आंटीही दारू खरेदी करण्यासाठी आली होती. दारू खरेदी केल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवादही साधला. यावेळी त्यांनी दवाई से मारे को असर नही होगा, पेग से असर होगा, असं सांगत त्यांनी दारुचं महत्त्व सांगितलं होतं.