पंतप्रधान मोदींच्या जवळच्या व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू , अहमदाबादेत सुरू होते उपचार

  • by

अहमदाबाद : नर्मदाबेन मोदी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकूचं कोरोनामुळे निधन झालं. अहमदाबादमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. नर्मदाबेन यांच्या कुटुंबीयांनी मंगळवारी त्यांचं निधन झाल्याची माहिती दिली.

नर्मदाबेन मोदी 80 वर्षांच्या होत्या. त्या अहमदाबादमधल्या राणीप भागात मुलांसमवेत राहात असत. त्यांचे पती जगजीवनदास मोदी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वडील दामोदरदास मोदी यांचे सख्खे बंधू होत. जगजीवनदास यांचं अनेक वर्षांपूर्वी निधन झालं आहे.पंतप्रधानांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांनी नर्मदाबेन यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला.

“आमची काकू नर्मदाबेन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले 10 दिवस उपचार घेत होती. कोरोनाच्या संसर्गानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली,” असं प्रल्हाद मोदी म्हणाले.